Vijay Wadettiwar: 'मी गुढी-बिढी काही उभारत नाही, छत्रपती संभाजी महाराज..' विजय वडेट्टीवारांचं विधान अन् वादाची ठिणगी

Gudi Padwa Celebrations Questioned by Vijay Wadettiwar: राज्यात विविध वाद सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गुढी पाडवा सणाबाबत वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
Wadettivar
WadettivarSaam
Published On

राज्यात विविध विषयांवर वादाची मालिका सुरूच आहे. औरंगजेबाची कबर, नागपूर हिंसाचार, कुणाल कामरा आणि आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गुढी पाडवा या सणावर केलेलं एक वादग्रस्त वक्तव्य. ज्यामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. गुढी पाडवा या सणाबाबत त्यांनी एक विधान केलं. तसेच गुढी पाडवा हा सण साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

'मी गुढी-बिढी काही उभारत नाही, छत्रपती संभाजी महाराज यांचा खून झाला, त्याचा हा दुसरा दिवस आहे. आम्ही काय म्हणून आनंदाची गुढी उभारावी? आम्ही या भानगडीत पडत नाही. ज्याला पडायचं त्याला पडू द्या', असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

Wadettivar
Crime: नाचताना धक्का लागला, रागात सपासप वार करून तरुणाला संपवलं; लग्नात रक्तरंजित राडा

मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का?

मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही, असे म्हणत मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केला आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे आणि उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Wadettivar
Black Magic: नारळ, बाहुल्या, लिंबू अन् काळा बुक्का; राष्ट्रवादीच्या नेत्याचा घरासमोर महिलेचा अघोरी प्रकार

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्यावतीने चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी गुढी पाडवा हा सण साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com