Jyoti Malhotra: देशाशी गद्दारी करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा जणांना अटक|VIDEO

Haryanvi YouTuber: हरियाणाच्या एका सुंदर यूट्यूबरने भारताची गद्दारी केली असून गुप्तहेर बनून पाकिस्तानला मदत केल्याचा आरोप हिच्यावर आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असणारी हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सला संवेदनशील माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप आहे. माहितीनुसार 2023 मध्ये ज्योती मल्होत्राने कमिशनद्वारे पाकिस्तानचा व्हिसा मिळवला आणि ती तिथे गेली होती. याच काळात पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत असलेल्या दानिश नावाच्या कर्मचाऱ्याशी तिचे जवळचे संबंध निर्माण झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच ठिकाणी तिचा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क सुरू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com