NZ vs AFG World Cup Match: न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचे 'पठाण' ढेर, अवघ्या १३९ धावांवर संघ ढेपाळला

NZ vs AFG World Cup Match: गोलंदाजीने न्यूझीलंडला जेरीस आणणारा अफगाणिस्तानचा संघ हा १३९ धावांवर गारद झाला.
NZ vs AFG World Cup Match
NZ vs AFG World Cup MatchTwitter
Published On: 

New Zealand vs Afghanistan World Cup 2023 :

न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानदरम्यान बुधवारी विश्वचषकाचा १६ वा सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानला २९० धावांचं आव्हान दिलं. मात्र, गोलंदाजीने न्यूझीलंडला जेरीस आणणारा अफगाणिस्तानचा संघ हा १३९ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडने तब्बल १४९ धावांनी अफगाणिस्तानवर मात केली. (Latest Marathi News)

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडने ५० षटकात २८९ धावा पूर्ण केल्या. ग्लेन फिलिप्सने ८० चेंडूत ७१ धावा कुटल्या. या डावात चार चौकार, चार षटकारांचा सामावेश आहे. टॉमनेही ७४ चेंडूत ६८ धावा कुटल्या.

NZ vs AFG World Cup Match
ICC ODI Rankings: हिटमॅन इज बॅक! ICC च्या रँकिंगमध्ये रोहितची मोठी झेप; विराटला मागे सोडत केला मोठा विक्रम

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तानला गुरबाजच्या रुपाने पहिला धक्का बसला. गुरबाजने २१ चेंडूत ११ धावा केल्या. मॅट हॅनरीने सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर गुरबाजला बाद केले.

गुरबाज बाद झाल्यानंतर जादरानही तंबूत परतला. दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर अफगाणिस्तान संघावर दबाव निर्माण झाला. मात्र,पुढे उमरजईने संयमी खेळी खेळली.

NZ vs AFG World Cup Match
Mumbai Indians News: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! आयपीएल लिलावापूर्वी दिग्गज खेळाडूने सोडली संघाची साथ

अफगाणिस्तानला चौथा धक्का उमरजईच्या रुपात बसला. अफगाणिस्तान संघाने २७ व्या षटकात १०० धावांचा आकडा पार केला. मात्र, पुढे २९ व्या षटकात निम्मा संघ गारद झाला.पुढे मोहम्मद नबीही बाद झाला. मोहम्मद नबी देखील स्वस्तात माघारी परतला.

नबी बाद झाल्यानंतर संघावर आणखी दबाव वाढला. राशिद खान देखील ३४ व्या षटकात बाद झाला. राशिदने १३ चेंडूत ८ धावा केल्या. राशिदनंतर अफगाणिस्तान संघ बाद झाला. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १३९ धावांवर ढेपाळला. यामुळे न्यूझीलंडचा संघ १४९ धावांनी जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com