ICC ODI Rankings: हिटमॅन इज बॅक! ICC च्या रँकिंगमध्ये रोहितची मोठी झेप; विराटला मागे सोडत केला मोठा विक्रम

Latest ODI Rankings: या यादीत रोहितला मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
virat kohli rohit sharma
virat kohli rohit sharmasaam tv
Published On: 

ICC ODI Rankings:

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला २०२३ ची हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. मात्र वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत तो जोरदार फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं आहे. अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने १३१ धावांची खेळी केली होती.

त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८६ धावा चोपल्या होत्या. या दमदार खेळीचा त्याला आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

रोहित शर्माची मोठी झेप..

रोहित शर्माने आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. गेल्या २ इनिंगमध्ये दमदार खेळ केल्याने तो अकराव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर इंग्लंडचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मलान ७११ रेटींग पाँइंट्ससह आठव्या स्थानी आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली नवव्या स्थानी आहे. आयसीसीच्या रँकिंगमध्ये रोहित शर्माने पहिल्यांदाच विराट कोहलीला मागे सोडलं आहे.

virat kohli rohit sharma
IND vs BAN: बांगलादेशला हलक्यात घेणं पडू शकतं महगात; वाचा कसा राहिलाय IND vs BAN चा वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड

बाबर आझम अव्वल स्थानी कायम..

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८३६ रेटींग पाँइंट्ससह या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. तर भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल ८३६ रेटींग पाँइंट्ससह दुसऱ्या स्थानी कायम आहे.

virat kohli rohit sharma
IND vs BAN, Playing XI: बांगलादेशला धुळ चारण्यासाठी रोहितचा 'मास्टरप्लान; संघात स्टार खेळाडूला देणार स्थान;पाहा प्लेइंग ११

तर गोलंदाजांच्या रँकिंगबद्दल बोलायचं झालं तर, गेले काही महिने मैदानापासून दुर असलेल्या ट्रेंट बोल्टनेही वर्ल्डकप स्पर्धेतून दमदार कमबॅक केल्याचं पाहायला मिळालं आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड ६६० रेटींग पाँइंट्ससह या यादीत अव्वल स्थानी आहे. तर ६५९ रेटींग पाँइंट्ससह ट्रेंट बोल्ट दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज ६५६ रेटींग पाँइंट्ससह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. (Latest sports updates)

अष्टपैलू खेळाडूंची यादी...

अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, शाकिब अल हसन या यादीत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाकडून दमदार खेळ करत असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. तो अकराव्या स्थानावरून आठव्या स्थानी पोहोचला आहे. तर भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या या यादीत नवव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com