IND vs BAN: बांगलादेशला हलक्यात घेणं पडू शकतं महगात; वाचा कसा राहिलाय IND vs BAN चा वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड

India vs Bangladesh Head To Head Record: वाचा कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड.
India vs Bangladesh Head To Head Record
India vs Bangladesh Head To Head RecordSaam tv news
Published On

India vs Bangladesh Head To Head Record:

भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. हा सामना १० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता सुरू होईल. भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार खेळ केला आहे.

भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. भारताचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

आता बांगलादेशला पराभूत करून भारतीय संघ गुणतालिकेत आपली स्थिती आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड. (India vs Bangladesh Head To Head Record)

वर्ल्डकप स्पर्धेत असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड...

वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा बांगलादेशविरूद्ध दमदार रेकॉर्ड राहिला आहे. हे दोन्ही संघ आतापर्यंत ४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर केवळ एका सामन्यात बांगलादेशला विजय मिळवता आला आहे.

भारतीय संघाने २०११,२०१५ आणि २०१९ वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशला धुळ चारली आहे. बांगलादेशने २००७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला मोठा धक्का दिला होता. या स्पर्धेत बांगलादेशकडून पराभूत झाल्याने भारताचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता.

India vs Bangladesh Head To Head Record
IND vs BAN, Playing XI: बांगलादेशला धुळ चारण्यासाठी रोहितचा 'मास्टरप्लान; संघात स्टार खेळाडूला देणार स्थान;पाहा प्लेइंग ११

असा राहिलाय दोन्ही संघातील सामन्यांचा रेकॉर्ड..

भारत विरूद्ध बांगलादेश - २००७ वनडे वर्ल्डकप - बांगलादेशचा ५ गडी राखून विजय

भारत विरूद्ध बांगलादेश -२०११ वनडे वर्ल्डकप - भारतीय संघाचा ८७ धावांनी विजय

भारत विरूद्ध बांगलादेश - २०१५ वनडे वर्ल्डकप - भारतीय संघाचा १०९ धावांनी विजय

भारत विरूद्ध बांगलादेश- २०१९ वनडे वर्ल्डकप- भारतीय संघाचा २८ धावांनी विजय

India vs Bangladesh Head To Head Record
World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा रडीचा डाव, भारताविरूद्धच्या सामन्यानंतर थेट ICCकडे तक्रार, काय आहे प्रकरण?

हे दोन्ही संघ २०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर २८ धावांनी विजय मिळवला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने ९ गडी बाद ३१४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाला २८६ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने २८ धावांनी जिंकला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com