World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा रडीचा डाव, भारताविरूद्धच्या सामन्यानंतर थेट ICCकडे तक्रार, काय आहे प्रकरण?

PCB Files Complaint On Indian Cricket Fans: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट फॅन्सची आयसीसीकडे तक्रार केली आहे.
indian cricket fans
indian cricket fanssaam tv news
Published On

PCB Files Complaint On Indian Cricket Fans:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगला होता.PCB Files Complaint On Indian Cricket Fans:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बॉर्ड (PCB) अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे.

पाकिस्तानने क्रिकेट बोर्डने भारतीय क्रिकेट फॅन्सची थेट आयसीसीकडे तक्रार केली आहे. PCB चं असं म्हणणं आहे की, या सामन्यादरम्यान भारतीय फॅन्सची वागणूक योग्य नव्हती. यासह त्यांचं असंही म्हणणं आहे की, हा सामना पाहण्यासाठी भारतात येणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आणि पत्रकारांना व्हिजा देण्यात मुद्दाम उशीर करण्यात आला.

या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर यांनी म्हटले होते की, 'पाकिस्तानच्या पराभवावर मला कुठलही कारण द्यायचं नाही.मात्र, अहमदाबादमधील वातावरण पाहता ही आयसीसीची स्पर्धा नव्हे तर बीसीसीआयने आयोजित केलेला कार्यक्रम वाटत होता. पाकिस्तान संघाचे गाणं आम्हाला एकदाही स्टेडियममध्ये ऐकायला मिळालं नाही. संपूर्ण स्टेडियममध्ये निळ्या रंगाची जर्सीच दिसत होती.पाकच्या चाहत्यांची भारतात येण्याची इच्छा व्हिजामुळे पूर्ण होऊ शकली नाही.'

indian cricket fans
NZ vs AFG, Playing XI: इंग्लंडनंतर आता न्यूझीलंडचा नंबर! चेन्नईत हा खेळाडू अफगाणिस्तानसाठी ठरणार ट्रम्प कार्ड

तसेच ते पुढे म्हणाले होते की, ' मी वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाविरूद्ध दोन हात करण्याची वाट पाहतोय. या सामन्यात मी दिल-दिल पाकिस्तान असं ऐकलं नाही. हे स्लोगन सामन्यात महत्वाची भुमिका बजावतात.'PCB ने केलेल्या या तक्रारीचा आढावा घेण्याचा विश्वास ICC ने व्यक्त केला आहे. (Latest sports updates)

indian cricket fans
Viral Cricket Video: 'मै झुकेगा नही साला..', हैदराबादमध्ये दिसला वॉर्नरचा पुष्पा अंदाज ! कॅच पकडताच केलं भन्नाट सेलिब्रेशन

भारतीय संघाचा दमदार विजय..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाने डावाची सुरूवात तर चांगली केली होती. मात्र नंतर पाकिस्तानचा डाव पत्त्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

पाकिस्तानचा डाव ४२.५ षटकात अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानने भारतीय संघाला जिंकण्यासाठी १९२ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने नाबाद अर्धशतकी खेळी केली. हा सामना भारतीय संघाने ७ गडी राखून जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com