IPL 2026 qualifier-1 : क्वालिफायर १ सामना पावसात वाहून गेला तर...; कोणता संघ फायनलमध्ये धडकणार? जाणून घ्या समीकरण

RCB vs GT qualifier-1 : आयपीएल २०२६ या पर्वातील अवघे ४ सामने शिल्लक आहेत. क्वालिफायर १ ची लढत धर्मशालेत होत आहे. तर एलिमिनेटर आणि क्वालिफायर २ चे सामने न्यू चंदीगडमध्ये होणार आहेत. ३१ मे रोजीचा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
क्वालिफायर १ सामना रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये पोहोचणार? गुजरात टायटन्स की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू?
Gujarat Titans vs Royal Challengers Bengalurusaam tv
Published On

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या चार 'धुरंधर' संघांनी आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. आता सगळ्यांचे लक्ष क्वालिफायर १ च्या लढतीकडे लागलेले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये मंगळवार, २६ मे रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये लढत होत आहे. संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात येतील. तर ७.३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होणार आहे.

धर्मशालेत जर पाऊस पडला तर, काय होईल, निकाल काय असेल. हा संपूर्ण सामना पावसामुळं रद्द होतो की काय, असे एक ना अनेक प्रश्न आयपीएल चाहत्यांना पडले आहेत. मात्र, धर्मशालेत सामन्याच्या वेळी हवामान उत्तम असणार आहे. पावसाची सुतराम शक्यता नाही असे सांगितले जात आहे. पण वारं कधी फिरेल काही सांगता येत नाही. त्यामुळं धर्मशालेत जर अचानक हवामानात काही बदल झाला आणि पावसानं हजेरी लावली, तसेच हा सामना रद्द करावा लागला तर काय होणार? हा सर्वात मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. जर सामना पावसामुळं रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये पोहोचणार, याबाबतचं समीकरण (rcb vs gt qualifier 1 washed out scenario) जाणून घेऊयात.

IPL च्या प्लेइंग ११ कंडीशन्समध्ये याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जर फायनल, एलिमिनेटर, क्वालिफायर १ किंवा क्वालिफायर २ हे सामने टाय झाले किंवा पावसामुळं रद्द झाले तर विजेता निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जर पहिला सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर आवश्यकता भासल्यास आणखी एक सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल. जोपर्यंत निकाल लागणार नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.

पाऊस किंवा खराब हवामानामुळं, तसेच अन्य कोणत्या कारणामुळं सुपर ओव्हर खेळवणे शक्य झाले नाही तर, लीग स्टेजमधील पॉइंट्सवरून याबाबतचा निर्णय घेतला जाईल. लीग स्टेजमध्ये प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त गुण असलेल्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. याचाच अर्थ जर पावसामुळं सामना रद्द झाला तर अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ फायनलमध्ये पोहोचेल. कारण पॉइंट्स टेबलमध्ये हा संघ अव्वल स्थानी आहे. तर गुजरात टायटन्सला क्वालिफायर २ चा सामना खेळावा लागेल.

आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ सामन्यांसाठी बीसीसीआयने रिझर्व्ह डेची घोषणा केली नाही. तर फायनलच्या सामन्यासाठी याआधीच रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. तर एलिमिनेटर, क्वालिफायर १ आणि क्वालिफायर २ साठी मागील पर्वात कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये नॉकआउट सामना जिंकणे महत्वाचे नाही तर, लीग स्टेजमध्येही चांगली कामगिरी करणे आवश्यक ठरते. टॉप २ मध्ये स्थान मिळवणे आणि चांगला नेट रनरेट ठेवण्यासाठी चढाओढ असते. पावसामुळे सामना रद्द झाला किंवा कोणत्या कारणामुळं सामन्याचा निकाल लागू शकला नाही तर अशा परिस्थितीत संपूर्ण स्पर्धेत सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या संघाला पुढे वाटचाल दिली जाते.

क्वालिफायर १ सामना रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये पोहोचणार? गुजरात टायटन्स की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू?
RCB playoff news: प्लेऑफपूर्वी RCB ला मोठा झटका; हा मॅनविनर खेळाडू पडला बाहेर

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग ११ - शुभमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, अरशद खान, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, निशांत सिंधु.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाची संभाव्य प्लेइंग ११ : रजत पाटीदार (कॅप्टन), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, टिम डेविड, रोमारियो शफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, रसिक सलाम डार.

क्वालिफायर १ सामना रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये पोहोचणार? गुजरात टायटन्स की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू?
IPL 2026: मुंबईचा शेवटचा सामनाही देवाला, राजस्थानची प्लेऑफमध्ये रॉयल एन्ट्री, पंजाब-कोलकात्याचा खेळ खल्लास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com