IPL 2026: मुंबईचा शेवटचा सामनाही देवाला, राजस्थानची प्लेऑफमध्ये रॉयल एन्ट्री, पंजाब-कोलकात्याचा खेळ खल्लास

वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईच्या पराभवामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या प्लेऑफच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.
IPL 2026
IPL 2026saam tv
Published On

मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज २ टीम्सचं भविष्य ठरवणारा सामना रंगला होता. मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगला होता. या सामन्यात राजस्थानने मुंबईचा पराभव केला आहे. मुंबईच्या या पराभवामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. तर राजस्थान रॉयल्सचा प्लेऑफचं तिकीट मिळालं आहे.

गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB), गुजरात टायटन्स (GT) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या टीम्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. लीग टप्प्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर पहिल्या, गुजरात टायटन्स दुसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर राहिले, तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थाना

IPL 2026
IPL 2026 Playoffs: प्लेऑफमध्ये गुजरात आणि आरसीबीचं स्थान निश्चित; उर्वरित २ जागांसाठी ६ टीम्समध्ये चुरस

आता, आयपीएल २०२६ मधील क्वालिफायर १ मंगळवारी २६ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवली जाणार आहे. त्या सामन्याचा विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेल्या संघाला आणखी एक संधी मिळेल आणि तो क्वालिफायर २ मध्ये खेळेल.

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामना जिंकणारा संघही क्वालिफायर २ मध्ये प्रवेश करेल. क्वालिफायर २ चा विजेता अंतिम सामन्यात क्वालिफायर १ च्या विजेत्याशी सामना करेल.

IPL 2026
RCB playoff news: प्लेऑफपूर्वी RCB ला मोठा झटका; हा मॅनविनर खेळाडू पडला बाहेर

राजस्थानकडून मुंबईचा पराभव

रविवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात सामना झाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ३० रन्सने विजय मिळवला. २०६ धावांचं लक्ष्य ठेवूनही मुंबईला ९ विकेट्स गमावून केवळ १७५ रन्सच करता आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com