IPL 2026 Playoffs: प्लेऑफमध्ये गुजरात आणि आरसीबीचं स्थान निश्चित; उर्वरित २ जागांसाठी ६ टीम्समध्ये चुरस

Playoff qualification: आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ शर्यतीत आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. गुजरात आणि आरसीबी आघाडीवर असल्या तरी त्यांचे स्थान निश्चित झालेले नाही, तर केकेआर आणि दिल्लीच्या संधी जवळपास संपल्या आहेत.
Playoff qualification
Playoff qualificationsaam tv
Published On

आयपीएल २०२६ च्या प्लेऑफसाठीची शर्यत आता चांगलीच रोमांचक झाली आहे. लीगमधील केवळ १३ सामने शिल्लक आहेत तरीही अजून प्लेऑफसाठी पात्र ठरणारी पहिली टीम अजून ठरलेली नाही. आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांचे प्रत्येकी १६ पॉईंट्स मिळवले आहेत. पण त्यांनी अद्याप प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केलेलं नाही.

एकंदरीत आपण आयपीएलमध्ये पाहिलं तर १६ पॉईंट्स मिळवणारी टीम प्लेऑफसाठी पात्र ठरतात. परंतु यावेळी तसं घडलेलं नाही. आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यानंतर प्लेऑफमधील स्थानासाठीची शर्यत आता सहा टीम्समध्ये आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स ऑफिशियली स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्याही प्लेऑफच्या संधी आता कमी झाल्या आहेत. प्रत्येक टीमसाठी आता कसं समीकरण बनतंय ते पाहूयात.

Playoff qualification
CSK संघाला सर्वात मोठा धक्का; सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज IPL मधून बाहेर

गुजरात टायटन्स

गुजरातचे पॉईंट्स पाहता ते प्लेऑफ गाठण्याची शक्यता ९९.७% शक्यता आहे. गुजरात दुसरं स्थान मिळवण्याची ८२.६% शक्यता आहे. GT ला दोन सामने खेळायचे आहेत आणि ते जास्तीत जास्त २० गुण मिळवू शकतात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू

आरसीबीचे १६ पॉईंट्स आहे आणि लीग टप्प्यात त्यांचे अजून दोन सामने बाकी आहेत. त्यांच्या पॉईंट्सनुसार ते टॉप ४ मध्ये स्थान मिळवण्याची ९९% शक्यता आहे. इतकंच नाही तर ते आणि पहिल्या दोनमध्ये मिळवण्याची ७७.६% शक्यता आहे.

सनरायझर्स हैदराबाद

सध्याच्या पॉईंट्सच्या आधारावर SRH ची टॉप ४ मध्ये येण्याची शक्यता ७७% आहे. तर पहिल्या दोनमध्ये येण्याची शक्यता केवळ ३१.४% आहे. त्यांचे दोन सामने बाकी आहेत.

पंजाब किंग्स

PBKS चे तीन सामने शिल्लक असून ते जास्तीत जास्त १९ गुण मिळवू शकतात. त्यामुळे ही टीम पहिल्या चारमध्ये येण्याची त्यांची शक्यता ६३.६% आहे आणि पहिल्या दोनमध्ये येण्याची शक्यता केवळ २२.२% आहे.

Playoff qualification
IPL Playoff Scenario: पंजाबच्या पराभवाचा फायदा चेन्नई-कोलकात्याला, वाचा ८ संघाचे प्लेऑफचे नेमकं गणित

चेन्नई सुपर किंग्स

सीएसकेच्या टॉप ४मध्ये स्थान मिळवण्याची शक्यता ५३.२% आहे. त्यांचे उर्वरित तीन सामने लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्याविरुद्ध आहेत. शेवटचे दोन सामने आव्हानात्मक आहेत. सीएसकेची टॉप २ मध्ये येण्याची शक्यता केवळ १९% आहे.

राजस्थान रॉयल्स

शेवटच्या सात सामन्यांपैकी पाच सामने गमावलेल्या आरआर टीमची टॉप ४ मध्ये येण्याची शक्यता ५३% आहे. त्यांच्याकडे सध्या १२ गुण असून त्यांना अजून तीन सामने खेळायचे आहेत. अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्याची त्यांची शक्यता केवळ १५.३% आहे.

Playoff qualification
Axar Patel: अक्षर पटेलने केली मॅच फिक्सिंग? दिल्ली-पंजाब सामन्यात नेमकं झालं काय? वाचा

केकेआर आणि दिल्ली

आरसीबीकडून पराभव झाल्यामुळे, केकेआरच्या अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता केवळ २.६% पर्यंत कमी झालीये. या स्पर्धेतील त्यांचा प्रवास आता जवळपास संपुष्टात आलाय. तर दुसरीकडे डीसीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यताही खूप कमी असून ती केवळ २.७% आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com