

रजत पाटीदारने ३३ चेंडूंमध्ये नाबाद ९३ धावा केल्या.
त्याने खेळीत ९ षटकार ठोकत गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली.
एका प्रचंड षटकारानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल झाली.
आयपीएल २०२६ चा पहिला क्वालिफायर सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले होते. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने कर्णधार पदाला शोभेल अशी खेळी केली. त्याने ३३ चेंडूंमध्ये ९३ धावांची नाबाद कर्णधारीय खेळी केली.
त्याच्या या खेळीमुळे आरसीबीला आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारण्यास मदत झाली. आपल्या खेळीदरम्यान रजत पाटीदारने मारलेल्या षटकाराने विराट कोहलीसह स्टेडियममधील सर्वांना चकित केले. (Viral Moment! Virat Kohli Reacts to Rajat Patidar’s Massive Six)
रजत पाटीदारने डावाच्या १७ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हा षटकार मारला. त्याआधी त्याने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवरही त्याने षटकार ठोकला. पाटीदारचा षटकार पाहून स्टेडियमवरील सर्व आश्चर्यचकित झालं. समालोचक रवी शास्त्रीसुद्धा त्याचा फटका थक्क झाला.
रवी शास्त्री यांनी या षटकाराला आतापर्यंतच्या सामन्यातील सर्वोत्तम षटकार असल्याचं म्हटले. रबाडाने हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चांगल्या लेंथवर टाकला होता. पण पाटीदारने बॅकफूटवर उभे राहून कव्हर्सवरून एक जोरदार षटकार मारला. या फटक्यावर विराट कोहलीची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीसुद्धा षटकार पाहून आवाक झाला. त्याची रिअॅक्शन व्हायरल होतेय.
आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील हे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी २०१४ मध्ये, वीरेंद्र सेहवागने वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अवघ्या २१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होतं. २०१३ मध्ये ड्वेन स्मिथनेही चेन्नईविरुद्ध २१ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. आयपीएल प्लेऑफमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध १६ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.