Vaibhav Sooryavanshi: अरं वैभवा काय केलास तू! महत्त्वाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी फ्लॉप

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सचा हुकमी एक्का असलेला सलामीवीर वैभव सूर्यवंशी महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरला. संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना त्याने सर्वांना निराश केलं.
Vaibhav Sooryavanshi:
Rajasthan Royals opener Vaibhav Sooryavanshi failed to deliver in the crucial IPL 2026 clash against Mumbai Indianssaam tv
Published On
Summary
  • मुंबईविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी फ्लॉप.

  • राजस्थान रॉयल्ससाठी हा करो या मरो सामना होता.

  • प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थानला विजय आवश्यक.

आयपीएल २०२६ मधील मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना २४ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जातोय. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच सामन्यात मुंबईला हरवून राजस्थान आपले प्लेऑफमधील स्थान निश्चित करू शकते. या करो या मरो च्या सामन्यात संघाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी सपशेल अपयशी ठरला.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले, पण राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही.राजस्थानचा संघ सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीकडून आक्रमक सुरूवातीची अपेक्षा ठेवून असतो. वैभवच्या आक्रमक फटकेबाजीमुळे राजस्थानचा संघ समोरील संघावर वर्चस्व गाजवत असतो. परंतु ऐन महत्त्वाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी फेल ठरला.

Vaibhav Sooryavanshi:
Virat Kohli: भर मैदानात ट्रेविस हेडशी भिडला विराट कोहली; सामन्यानंतर हँडशेक करणंही टाळलं, नेमकं काय घडलं, VIDEO

तोच नाही तर यशस्वी जैस्वालही मुंबईच्या गोलंदाजीसमोर अपयशी ठरला. जैस्वालने चांगली सुरुवात केली, पण त्याला त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. तो १७ चेंडूंमध्ये २७ धावा करून बाद झाला. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीने या सामन्यात सर्वांना निराश केले. तो ६ चेंडूंमध्ये केवळ ४ धावा करून बाद झाला आणि त्याला एकही चौकार मारता आला नाही.

Vaibhav Sooryavanshi:
RCB playoff news: प्लेऑफपूर्वी RCB ला मोठा झटका; हा मॅनविनर खेळाडू पडला बाहेर

६०० धावा अपूर्णच...!

वैभव सूर्यवंशीला चालू हंगामात मोठी खेळी करून ६०० धावांचा टप्पा गाठण्याची संधी होती, पण तो त्यात अपयशी ठरला. या सामन्यापूर्वी त्याने १३ सामन्यांमध्ये ५७९ धावा केल्या होत्या, त्यामुळे त्याला ६०० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी केवळ २१ धावांची गरज होती. पण तो ४ धावांवर बाद झाला आणि त्याची एकूण धावसंख्या ५८३ झाली. जर राजस्थानने येथून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले, तर वैभवला ६०० धावांचा टप्पा गाठण्याची संधी मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com