Virat Kohli: भर मैदानात ट्रेविस हेडशी भिडला विराट कोहली; सामन्यानंतर हँडशेक करणंही टाळलं, नेमकं काय घडलं, VIDEO

Virat Kohli and Travis Head verbal spat in IPL: आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात विराट कोहली आणि ट्रेविस हेड यांच्यातील शाब्दिक चकमकीने चाहत्यांचं लक्ष वेधलं. विराटची आक्रमक बॉडी लँग्वेज, ट्रेविस हेडची विकेट आणि सामन्यानंतरच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर हा क्षण व्हायरल झाला.
Virat Kohli and Travis Head verbal spat in IPL
Virat Kohli and Travis Head verbal spat in IPLsaam tv
Published On

*शुक्रवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगला. या सामन्यात पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर असलेल्या आरसीबीचा पराभव झाला. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यामध्ये विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.

हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली आक्रमक दिसून आला. आरसीबीचा फलंदाज वेंकटेश अय्यर जोरदार फटकेबाजी करत होता. त्याने शिवांग कुमारच्या एका ओव्हर्समध्ये रन्सचा पाऊस पाडला. त्याचवेळी कॅमेरा विराट कोहली आणि ट्रेविस हेड यांच्याकडे वळला. विराट नॉन-स्ट्राइकर एंडवरून हेडकडे बोट दाखवत त्याला गोलंदाजीसाठी बोलावताना दिसला. कॉमेंट्रीटर्सच्या मते, कोहली मिश्कील पण आव्हानात्मक अंदाजात हेडला “चल, थोडी ऑफ स्पिन टाक” असं म्हणत होता.

Virat Kohli and Travis Head verbal spat in IPL
World Cup 2027: रोहित शर्माचा वनडे वर्ल्डकपमधून पत्ता होणार कट? BCCI ची चिंता वाढली, नेमकं कारण काय?

त्या चौथ्या ओव्हरमध्ये वेंकटेश अय्यरने तब्बल 23 रन्स चोपले. त्यानंतर विराट वारंवार ट्रेविस हेडकडे पाहत काहीतरी बोलताना दिसत होता. एका क्षणी तर त्याने इशारा करत हेडला दूर जाण्यास सांगितल्याचं दिसलं. दोघांच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी विराटची आक्रमक बॉडी लँग्वेज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होती.

सामन्यात ही पहिलीच वेळ नव्हती ज्यावेली विराट आणि हेड आमनेसामने आले होते. ट्रेविस हेड फिल्डिंगसाठी जागा बदलत असताना विराट त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसला. या दोन्ही खेळाडूंमधील ही बाब सोशल मीडियावर चाहत्यांसाठी मोठा एंटरटेनमेंट मोमेंट ठरली. सामना संपल्यानंतरही दोघांमधील ‘कोल्ड वॉर’ची चर्चा कायम राहिली. सामन्यानंतर विराटने हेडशी हँडशेक न केल्याचं कॅमेरात कैद झालं.

Virat Kohli and Travis Head verbal spat in IPL
T20 Mumbai League: वानखेडेवर रंगणार क्रिकेटचा जल्लोष, T20 मुंबई लीग ट्रॉफी टूरने मुंबईकरांमध्ये वाढवली उत्सुकता

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 255 रन्सचा प्रचंड स्कोर उभारला होता. ट्रेविस हेड 26 रन्स करून बाद झाला. हेड बाद झाल्यानंतर विराट कोहलीने केलेला जल्लोषही चर्चेत राहिला. विकेट मिळताच विराट जोरात ओरडत सेलिब्रेशन करताना दिसला.

Virat Kohli and Travis Head verbal spat in IPL
IPL 2006: राजा की रंक! पंजाब किंग्ससमोर 'करो की मरो'ची स्थिती; जाणून घ्या प्लेऑफचं संपूर्ण समीकरण

विराट कोहली ठरला फ्लॉप

फलंदाजीत मात्र विराट कोहलीला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तो केवळ 15 रन्स करून बाद झाला. साकिब हुसेनच्या गोलंदाजीवर कोहली कॅचआऊट झाला. दुसरीकडे ट्रेविस हेडने गोलंदाजीही केली. यावेळी त्याने आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारची महत्त्वाची विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com