T20 Mumbai League: वानखेडेवर रंगणार क्रिकेटचा जल्लोष, T20 मुंबई लीग ट्रॉफी टूरने मुंबईकरांमध्ये वाढवली उत्सुकता

टी२० मुंबई लीग आणि पहिल्या महिला टी२० मुंबई लीगच्या ट्रॉफी टूरला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वानखेडे स्टेडियमवर १ ते १३ जूनदरम्यान सामने रंगणार असून क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे.
T20 Mumbai League
T20 Mumbai Leaguesaam tv
Published On

T20 मुंबई लीगच्या नवीन सिझनचं आणि पहिल्या वहिल्या T20 मुंबई महिला लीगचं काउंटडाऊन आता अधिकच उत्साहात होतंय. यासाठी निमित्त होते ते ट्रॉफी टूरचा शुभारंभ झाला. या टूरमुळे संपूर्ण शहरातील क्रिकेट चाहते उत्सुक असल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील प्रतिष्ठित रस्त्यांपासून ते गजबजलेल्या परिसरांपर्यंत, सर्वत्रच उत्साहाचे आणि उत्कंठेचे वातावरण होतं. या चषकाचं स्वागत करण्यासाठी आणि शहरात रंगणाऱ्या या भव्य क्रिकेट महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आनंद साजरा करण्यासाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

T20 मुंबई लीगचा चौथा हंगाम आणि पहिल्या T20 मुंबई महिला लीगचे सामने 1 ते 13 जून या कालावधीत मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

चषक दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी, या चषकाने दक्षिण मुंबईतील वरळी सी-फेस, वरळी स्पोर्ट्स क्लब आणि लालबागच्या गरमखडा मैदान अशा अनेक प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या. या दौऱ्याने उत्साही क्रिकेटप्रेमींनी आकर्षित केलेच पण आगामी स्पर्धांविषयीची उत्सुकता अधिकच वाढवली; यावेळी चाहत्यांनी या चषकाचे जवळून दर्शन घेतले आणि तो अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी छायाचित्रे काढली.

दोन आठवडे चालणाऱ्या या चषक दौऱ्यामागची संकल्पना म्हणजे संपूर्ण शहराला सामावून घेणारा एक चाहते-संवाद उपक्रम. यामागील मुख्य उद्देश म्हणजे, लीगभोवती निर्माण झालेला उत्साह केवळ स्टेडियमपुरता मर्यादित न ठेवता, तो मुंबईच्या क्रिकेटप्रेमी समुदायांपर्यंत पोहोचवणं हा आहे.

शुक्रवार ते रविवार या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा दौरा संपूर्ण मुंबई शहर, उपनगर आणि लगतच्या भागांमध्ये प्रवास करेल. यामध्ये दादर, वरळी, चर्चगेट, चेंबूर, वांद्रे, विरार, नवी मुंबई आणि ठाणे यांसारख्या विविध ठिकाणांचा समावेश असेल.

T20 Mumbai League
IPL rules: आयपीएलमध्ये येणार नवे नियम; १०० मीटरपेक्षा लांब षटकार मारला तर ८ धावा मिळणार?

हा चषक दाखवण्यासोबतच, या उपक्रमांतर्गत चाहत्यांना लीगशी जोडून घेण्याच्या उद्देशाने विविध प्रत्यक्ष सहभाग उपक्रम, लोकांशी संवाद आणि सामाजिक संपर्क कार्यक्रम आयोजित केले जातील. या दौऱ्यादरम्यान, लीगचा शुभंकर अर्थात मॅस्कॉट असलेला "बाउन्सर भाऊ" देखील उपस्थित असेल. तो चाहत्यांशी संवाद साधेल आणि संपूर्ण शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक उत्साही तसेच मनोरंजक वातावरण निर्माण करेल.

एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितलं की, “प्रतिभावान खेळाडूंना संधी उपलब्ध करून देऊन, तसंच या खेळाचा आणि त्याच्या चाहत्यांचा परस्परसंबंध अधिक दृढ करून, मुंबईची क्रिकेट परिसंस्था बळकट करण्यात T20 मुंबई लीगने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ट्रॉफी टूरच्या माध्यमातून, या दोन्ही स्पर्धांचा उत्साह आम्हाला थेट मुंबईकरांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि क्रिकेटबद्दल या शहराच्या चिरंतन आवडीचा तसेच उत्साहाचा आम्हाला यथोचित गौरव करायचा आहे.”

T20 Mumbai League
World Cup 2027: रोहित शर्माचा वनडे वर्ल्डकपमधून पत्ता होणार कट? BCCI ची चिंता वाढली, नेमकं कारण काय?

लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता पुढे म्हणाले, "T20 मुंबई लीग ज्या भावनेचे आणि ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते, त्याचेच प्रतिबिंब म्हणजे ही ट्रॉफी टूर. पहिल्याच दिवशी चाहत्यांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत चांगला असून या लीगने गेल्या काही वर्षात मुंबईतील क्रिकेटप्रेमींशी जो दृढ बंध निर्माण केला आहे. तो यातून अधोरेखित होतो."

T20 Mumbai League
मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका, हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर आली महत्त्वाची अपडेट, सूर्याच्या खेळण्यावरही संशय

फ्रँचायझी-आधारित देशांतर्गत T20 स्पर्धांपैकी एक असलेल्या T20 मुंबई लीगच्या चौथ्या सिझनमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, सरफराज खान आणि तुषार देशपांडे यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे, सायली सातघरे, हुमैरा काझी आणि सायमा ठाकूर यांसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असलेली महिलांची स्पर्धा मुंबईतील उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूंना एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com