

आयपीएल २०२६ मध्ये दमदार सुरुवात करणारा पंजाब किंग्स संघ आता प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. हंगामातील पहिल्या सात सामन्यांमध्ये अपराजित राहिलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघ पराभवांच्या मालिकेतून सावरू शकलेला नाही. सलग सहा सामने जिंकल्यानंतर पंजाबच्या संघाला पराभवाची साडेसाती लागली असून संघ आता 'करा किंवा मरा' अशा परिस्थितीत सापडला आहे.
पंजाब किंग्सचा सामना २३ मे रोजी लखनौ येथील श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. हा सामना पीबीकेएससाठी प्लेऑफपेक्षा कमी नाही, कारण पराभव झाल्यास संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.
जर पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला हरवले, तर त्यांचे १५ पॉईंट्स होतील. मात्र, यामुळे प्लेऑफमधील स्थानाची हमी मिळणार नाही. जर राजस्थान रॉयल्सने आपला सामना जिंकला, तर ते १६ पॉईट्स पंजाबला मागे टाकतील. कोलकाता नाईट रायडर्स संघही १५ पॉईट्सपर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत, ज्या संघाचा नेट रन रेट चांगला असेल तो प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.
जर पंजाब किंग्स आजचा सामना हरला, तर ते १३ पॉई्टससह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील. मात्र जर लखनौ आणि पंजाब यांच्यातील सामना पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाला तर पंजाबचे १४ गुण होतील. तरीही, धोका कायम असणार आहे.
राजस्थान आणि कोलकाता हे दोन्ही संघ पंजाबला मागे टाकू शकतात. दिल्ली कॅपिटल्स संघही १४ पॉई्ट्सपर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत, ज्या संघाचा नेट रन रेट चांगला असेल तो प्लेऑफसाठी पात्र ठरेल. पंजाब किंग्ससाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे त्यांचा खराब फॉर्म. सलग पराभवांनी त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.