बाद की नाबाद? अंपायरनं दिलं आऊट, गुजरातचं फुल सेलिब्रेशन; तरी मैदान सोडेना कोहली; कॅचवरून उडाला गोंधळ

IPL 2026 Final Kohli Catch: आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या वादग्रस्त झेलच्या निर्णयामुळे मोठा ड्रामा पाहायला मिळाला. या विकेटमुळे चाहत्यांमध्ये वाद का निर्माण झाला आहे, हे जाणून घ्या.
IPL 2026 Final Kohli Catch:
IPL 2026 Final Kohli Catch:
Published On

आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल २०२६ च्या विजेतेपदाच्या विजयाचा हिरो विराट कोहली ठरला. चेसमास्टर किंग कोहली डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला आणि आपल्या संघाला सलग दुसरे विजेतेपद मिळवून दिले. मात्र ऐन सामन्यात कोहलीच्या कॅचवरू मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

IPL 2026 Final Kohli Catch:
RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

असा पराक्रम करणारा पाटीदार तिसरा कर्णधार

रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल २०२६ चे विजेतेपद पटकावले. पाटीदार हे आयपीएलच्या इतिहासात सलग दोन विजेतेपदे जिंकणारे तिसरे कर्णधार ठरला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्याचा हिरो विराट कोहली होता. चेसमास्टर किंग कोहली डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला आणि षटकार मारून आरसीबीला सामना जिंकून दिला.

IPL 2026 Final Kohli Catch:
Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

कोहलीने जिंकवला सामना

आरसीबीच्या विकेट्स एका साईडला पडत होत्या, पण कोहलीने एक बाजू संभाळली. एकदा तर पंचांनी त्याला बादही दिले, पण टीव्ही पंचांनी मैदानातील पंचांचा निर्णय फिरवला आणि किंग कोहली आपल्या संघासाठी विजेतेपद घेऊन परतला. १५६ धावांचे लक्ष्य गाठताना आरसीबीच्या डावात १६ व्या षटकात एक नाट्यमय क्षण आला. त्यावेळी आरसीबीचा विजय केवळ एक औपचारिकता बनला होता.

कोहलीच्या कॅचवर मोठा ड्रामा

संघाने ५ गडी गमावून १३९ धावा केल्या होत्या. आता त्यांना ३० चेंडूंमध्ये केवळ १७ धावांची गरज होती. तेव्हा विराट कोहली ३३ चेंडूंमध्ये ५८ धावांवर, तर जितेश शर्मा ५ चेंडूंमध्ये ६ धावांवर खेळत होता. अशरद खान १६ वे षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर कोहलीला एकही धाव काढता आली नाही. त्याने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर कोहलीने एक धाव घेतली आणि क्षेत्ररक्षणाची बाजू बदलली. चौथ्या चेंडूवर जितेश शर्माला एकही धाव काढता आली नाही.

त्याने पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली आणि विराट कोहली स्ट्राईकवर आला. अरशदच्या षटकातील शेवटचा चेंडूवर विराट कोहलीने एक जबरदस्त फटका मारला, पण गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने एक अप्रतिम झेल घेतला. क्षेत्ररक्षक पंच नितीन मेमन यांनी कोहलीला बाद करार केलं. पण झेल योग्यरित्या घेतला गेला होता की नाही याबद्दल त्यांना शंका होती. दुसरीकडे गुजरातच्या खेळाडून जल्लोष सुरू केला होता.

मात्र कोहली आपण बाद नसल्याचं म्हणत होता. चेंडू जमिनीवर टेकला गेल्याचा कोहली सांगत होता. शेवटी निर्णय टीव्हीच्या अंपायरकडे गेला. त्यानंतर टीव्ही पंचांनी हस्तक्षेप केला. टीव्ही पंच जयरामन मदनगोपाल यांनी अनेक कोनांमधून झेलची तपासणी केली. रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते की चेंडूचा काही भाग जमिनीला लागला होता. टीव्ही पंचांनी कोहलीला नाबाद घोषित केले. त्यानंतर, किंग कोहलीने ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावा करून पुनरागमन केले आणि आरसीबीला सलग दुसरे विजेतेपद मिळवून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com