Venkatesh Iyer : 23.75 कोटी दिले म्हणजे धावा केल्याच पाहिजेत असं नाही; व्यंकटेश अय्यरचं अजब विधान

Venkatesh Iyer KKR Vs SRH Highlights : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना काल कोलकातामध्ये रंगला होता. या सामन्यामध्ये व्यकंटेश अय्यरने तुफानी खेळ केला. सामना संपल्यानंतर अय्यरने केलेल्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Venkatesh Iyer
Venkatesh Iyerx
Published On

KKR Vs SRH Highlights : ईडन गार्डन्समध्ये काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना खेळला गेला. घरच्या मैदानामध्ये कोलकाताने हैदराबादला धूळ चारत दोन गुण मिळवले. कालच्या सामन्यामध्ये हैदराबादचा ८० धावांनी पराजय झाला. केकेआरचा उपकर्णधार व्यंकटेश अय्यरच्या अमूल्य योगदानामुळे ईडन गार्डन्सवर कोलकाताने विजय संपादन केला. सामना संपल्यावर अय्यरने केलेल्या एका विधानाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

केकेआरने मेगा ऑक्शनमध्ये व्यंकटेश अय्यरवर २३.७५ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. त्यानंतर केकेआरने अय्यरला उपकर्णधारदेखील केले. कालच्या कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यात त्याने २९ बॉल्सवर ६० धावांची तुफानी कामगिरी केली. पण त्याआधीच्या सामन्यांमध्ये तो धावा करण्यामध्ये काहीसा अपयशी ठरत होता. त्यामुळे रिटेन प्राईज, महागडा खेळाडू, २३ कोटी यांवरुन व्यकंटेश अय्यरला ट्रोल करण्यात आले होते. या ट्रोलिंगवर त्याने प्रत्युत्तर दिले.

Venkatesh Iyer
MS Dhoni : श्रीलंकेत तू माझा बाप आहेस, पण भारतात माझ्यासाठी धोनीच... कोण आहे खेळाडू तो समजतोय स्वत:ला थालाचा मुलगा?

सामना संपल्यावर व्यंकटेश अय्यर म्हणाला, "थोडं दडपण आहे खरं. पण आयपीएलमधला मी सर्वात महागडा खेळाडू आहे, याचा अर्थ मला प्रत्येक सामन्यात धावा करायच्याच आहे असा होत नाही. मी संघाला सामने कसे जिंकवून देऊ शकतो आणि मी खेळात कसा प्रभाव टाकत आहे. पैसे, सामन्यातील धावा यांच्यापेक्षा संघाच्या विजयाचे अधिक दडपण असते."

Venkatesh Iyer
Rohit Sharma Video : स्वत:ला लॉर्ड बोलतोस का? शार्दुल ठाकूरच्या 'बोलंदाजी'वर मैदानातच रोहितचा षटकार, Video व्हायरल

आयपीएल सुरु झाल्यानंतर तुम्हाला २० लाख मिळत आहेत की, २० कोटी त्याने काहीच फरक पडत नाही. हा सांघिक खेळ असून संघाच्या विजयात योगदान देणे हे माझे ध्येय आहे. बऱ्याच वेळा ओव्हर्समध्ये टीकून खेळणे गरजेचे असतात, अशा कठीण परिस्थितीमध्ये मी धावा केल्या नाही, तर संघाच्या विजयासाठी जे आवश्यक आहे, ते मी करतो, असे वक्तव्य देखील व्यंकटेश अय्यरने केले.

Venkatesh Iyer
Virat Kohli RCB : आरसीबीला मोठा धक्का... विराट कोहली संघाबाहेर जाणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com