Virat Kohli RCB : आरसीबीला मोठा धक्का... विराट कोहली संघाबाहेर जाणार?

Virat Kohli RCB IPL 2025 : काल चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बंगळुरू विरुद्ध गुजरात सामन्यामध्ये कॅच पकडण्याच्या प्रयत्नांमध्ये विराट कोहली दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या दुखापतीबाबतची नवी अपडेट समोर आली आहे.
Virat Kohli RCB
Virat Kohli RCBX
Published On

Virat Kohli Injury Update : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना काल चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये गुजरातने बंगळुरूवर विजय मिळवला. सलग दोन सामने जिंकल्यानंतर आरसीबीचा विजयरथ गुजरातने रोखला. पण पराभवापेक्षा आरसीबीचे चाहते विराट कोहलीच्या दुखापतीमुळे अधिक चिंताग्रस्त झाल्याचे समोर आले आहे.

आरसीबीची गोलंदाजी सुरु असताना विराट कोहली दुखापतग्रस्त झाला. कॅच पकडण्याच्या प्रयत्नांमध्ये त्याच्या बोटांना दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. दुखापतींमुळे विराट मैदानातच कळवळत होता. फिजिओ आणि मेडिकल टीमने त्याच्या दुखापतीचे निरीक्षण केले. त्यानंतर थोड्या वेळाने विराट फिल्डिंग करण्यासाठी सज्ज झाला.

Virat Kohli RCB
Mohammed Siraj : मनात काहूर, चेहऱ्यावर दडपण, विराटला पाहताच सिराज बॉल टाकायचा थांबला आणि...; इमोशनल Video पाहिलात का?

कॅच पकडण्याच्या प्रयत्नांमध्ये विराटला दुखापत झाली. त्यामुळे विराटचे अनेक चाहते चिंतेत होते. त्याला गंभीर दुखापत झाली आहे का असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात होते. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रमुख प्रशिक्षक एंडी फ्लावर यांनी विराटच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Virat Kohli RCB
Sara Tendulkar : 'हे माझ्या प्रेमासाठी...' सारा तेंडुलकरने खरेदी केला क्रिकेटचा संघ

'विराट पूर्णपणे ठीक आहे. तो खेळण्यासाठी तयार आहे. काळजी करण्याचे कारण नाही', असे वक्तव्य आरसीबीचे प्रमुख प्रशिक्षक एंडी फ्लावर यांनी केले आहे. त्यामुळे यापुढील बंगळुरूच्या सामन्यांमध्येही विराट कोहली खेळताना दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. कालच्या सामन्यात विराट लवकर बाद झाला होता. त्याने फक्त ७ धावा केल्या होत्या. अरशद खान या वेगवान गोलंदाजाने विराटला कॅचआउट केले होते.

Virat Kohli RCB
Shikhar Dhawan Girlfriend : सर्वात सुंदर मुलगी माझी गर्लफ्रेंड... शिखर धवनचा डेटिंगच्या चर्चांवर मोठा खुलासा, Video होतोय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com