MS Dhoni : श्रीलंकेत तू माझा बाप आहेस, पण भारतात माझ्यासाठी धोनीच... कोण आहे खेळाडू तो समजतोय स्वत:ला थालाचा मुलगा?

MS Dhoni CSK : चेन्नई सुपर किंग्सने यूट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात सीएसकेच्या एका वेगवान गोलंदाजाच्या क्रिकेट विश्वातील प्रवास दाखवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये या खेळाडूने धोनीचे खूप कौतुक केले आहे.
MS Dhoni CSK
MS Dhoni CSKx
Published On

एमएस धोनी हा क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्त्वामध्ये टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक क्रिकेटपटू त्यांना मिळालेल्या यशाचे श्रेय धोनीला देतात. एका श्रीलंकन खेळाडूनेदेखील धोनीच्या नेतृत्त्वकौशल्याचे कौतुक केले आहे.

२००८ पासून महेंद्रसिंह धोनी हा चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नेतृत्त्वाचा फायदा फक्त फ्रँचायझीलाच नाही तर बऱ्याच खेळाडूंनाही झाला आहे. असाच एक खेळाडू म्हणजे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज - मथीशा पाथिराना. एप्रिल २०२२ मध्ये पाथिरानाने आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळायला सुरुवात केली. २० लाख रुपयांची बोली लावून सीएसकेने त्याला संघात सामील केले.

MS Dhoni CSK
Rohit Sharma Video : स्वत:ला लॉर्ड बोलतोस का? शार्दुल ठाकूरच्या 'बोलंदाजी'वर मैदानातच रोहितचा षटकार, Video व्हायरल

चेन्नई सुपर किंग्सच्या यूट्यूब चॅनलवर मथीशा पाथिरानाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओमध्ये पाथिरानाचा क्रिकेट कारकीर्दीचा एकूण प्रवास दाखवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये पाथिरानाच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलाच्या कारकीर्दीवर धोनीचा प्रभाव असल्याचे सांगितले. "एमएस धोनीसाठी आमच्याकडे शब्दच नाहीयेत. तो खरा देव आहे. मथीशा ज्याप्रमाणे त्याच्या वडिलांचा आदर करतो, तसाच तो धोनीचा देखील आदर करतो", असे वक्तव्य पाथिरानाच्या आईने केले.

MS Dhoni CSK
Virat Kohli RCB : आरसीबीला मोठा धक्का... विराट कोहली संघाबाहेर जाणार?

"श्रीलंकेमध्ये तुम्ही माझे वडील आहात, पण भारतात एमएस धोनी माझे वडील आहे", असे मथीशा म्हणत असल्याचे त्याच्या वडिलांनी व्हिडीओमध्ये सांगितले. "एमएस धोनी यांनी माझ्यासाठी खूपकाही केले आहे, ते मला वडिलांसारखा आहेत. ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी मला घरी सपोर्ट केला, अगदीच त्याच प्रमाणे क्रिकेटच्या मैदानात धोनी यांनी मला सपोर्ट केला", असे मथीशा पाथिरानाने व्हिडीओमध्ये म्हटले.

MS Dhoni CSK
IPL 2025 : RCB ला पराभूत करणाऱ्या गुजरात टायटन्सला मोठा हादरा, अख्खी टीम टेन्शनमध्ये..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com