
IPL 2025 Updates : गुजरात टायटन्सने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्यांच्याच घरच्या स्टेडियममध्ये पराभव केला. सुरुवातीचे दोन सामने जिंकून पॉईंट टेबलवर टॉप करणाऱ्या बंगळुरूचा विजयी रथ गुजरातने रोखला. गुजरातच्या विजयामध्ये गोलंदाजांचे प्रमुख योगदान होते. दरम्यान गुजरातच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. त्यांचा स्टार गोलंदाज मायदेशी परतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा त्याच्या मायदेशी दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. रबाडा त्याचे वैयक्तिक काम करण्यासाठी आयपीएल सोडून दक्षिण आफ्रिकेला गेल्याचे गुजरात टायटन्सने स्पष्ट केले आहे. कालच्या बंगळुरू विरुद्ध गुजरात सामन्यामध्ये कागिसो रबाडाचा समावेश नव्हता.
आयपीएल २०२५ मध्ये गुजरातने पहिला सामना पंजाबच्या विरुद्ध खेळला. या सामन्यामध्ये पंजाबने गुजरातवर सहज मात केली. दुसऱ्या सामन्यात कमबॅक करत गुजरातने अहमदाबादमध्ये मुंबईला धूळ चारली. या दोन्ही सामन्यांमध्ये कागिसो रबाडा गुजरातकडून मैदानामध्ये उतरला होता. दोन्ही सामन्यांमध्ये त्याने प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या आहेत.
गुजरातचा पुढचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हैदराबादच्या घरच्या स्टेडियमवर GT विरुद्ध SRH सामना रंगणार आहे. कागिसो रबाडा या सामन्याला गैरहजर राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बलाढ्य हैदराबादचे आव्हान समोर असताना स्टार गोलंदाज संघात नसल्याचा फटका गुजरातला बसू शकेल असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.