वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा; सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात, अचानक नेमकं काय घडलं?

Vaibhav suryavanshi news : वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. त्याच्या सामन्याच्या मानधनातून तब्बल ५० टक्के कपात करण्यात आली आहे.
Vaibhav suryavanshi
Vaibhav suryavanshi news : Saam tv
Published On
Summary

वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा

वैभवची कृती ठरली वादग्रस्त

वैभव सूर्यवंशीच्या सामन्याच्या मानधनात कपात

आयपीएल स्पर्धेत चमकलेल्या वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. भारत ए आणि श्रीलंक ए संघात दांबुला येथे १५ जून रोजी झालेल्या सामन्यात वैभवची कृती वादग्रस्त ठरली. या सीरीजमधील सामन्यात विशेन हलम्बगे आणि वैभव सूर्यवंशीमध्ये मोठा वाद झाला.

रिपोर्टनुसार, मॅच रेफ्री प्रदीप जयप्रकाश यांनी वैभव सूर्यवंशीवर हलम्बगे याच्याशी वाद घालणे आणि मैदानात गोंधळ घातल्यप्रकरणी दोषी मानलं. विशेन हलम्बगे आणि वैभव सूर्यवंशीच्या सामन्याच्या मानधनातून दंड म्हणून ५० टक्के फीमध्ये कपात करण्यात आली आहे.

टीम इंडिया ए संघाचा कर्णधार तिलकच्या सामन्याच्या मानधनातून दंड म्हणून ३० टक्के कपात केली. तर श्रीलंका ए संघाचा विकेटकीपर निरोशन डिकवेलाच्या सामनाच्या मानधनातून २० टक्के कपात केली.

Vaibhav suryavanshi
Suryakumar Yadav: सूर्यकुमारला डबल धक्का; BCCI नंतर मुंबई इंडिन्यसही साथ सोडणार?

सामन्यात सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका ए संघानं विजय मिळवल्यानंतर वाद झाला. श्रीलंका ए संघाचे खेळाडू आणि भारत - ए संघाचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीमध्ये शा‍ब्दिक चकमक झाली.

तत्पूर्वी, वैभव सूर्यवंशी श्रीलंका ए विरोधात सीरीजममध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. वैभवने ४ सामन्यात अवघ्या ११७ धावा कुटल्या आहेत. दोन्ही संघाच्या खेळाडू धक्काबुक्की देखील झाली. टीम इंडिया - ए संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाल्यानंतर सर्व गोंधळ घडला.

Vaibhav suryavanshi
Vaibhav Suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सिनियर टीम इंडियामध्ये करणार डेब्यू? भारतीय कर्णधाराच्या सोशल मीडिया पोस्टने रंगली चर्चा

भारत ए संघाचे फिरकूपटू गोलंदाजीचे कोच साईराज बहुतुले यांनी सांगितलं की, युवा खेळाडू या घटनेतून बोध घेतील. श्रीलंका ए संघाच्या खेळाडूंनी देखील वर्तवणुकीचे धडे शिकून घ्यायला हवेत'. तत्पूर्वी, आयपीएलमध्ये चमकणारा या सीरीजमध्ये फारशी कमाल करू शकला नाही. श्रीलंका ए संघाविरोधात वैभवची बॅटिंग फारशी तळपली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com