Vaibhav Suryavanshi: क्रिकेटचं ऐतिहासिक 'वैभव' परतलं; वैभव सूर्यवंशीच्या 52 चेंडूत 204 धावा

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीनं क्रिकेट विश्वात नवा विक्रम प्रस्थापित केलाय. युएईविरुद्धच्या सामन्यात वैभवनं 204 धावांची तुफानी खेळी केलीये. पाहूयात वैभवच्या खेळीवरचा हा रिपोर्ट.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav SuryavanshiSaam Tv
Published On: 

Vaibhav Suryavanshi: अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने पुन्हा एकदा मैदानावर दाणादाण उडवलीय... आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत वैभवने विश्वविक्रमाचा डोंगर रचलाय... लिस्ट ए क्रिकेटमध्ये वैभवनं UAE विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 53 चेंडूत 204 धावांची स्फोटक खेळी करत क्रिकेट इतिहासात नवा अध्याय रचलाय... द्विशतकी खेळीत वैभवने षटकार आणि चौकारंची बरसात करत युएईच्या गोलंदाजांचा अक्षरश: पालापाचोळा केला... या विक्रमी खेळीत वैभवनं कोणकोणत्या विक्रमांना गवसणी घातलीये ते पाहूयात...

सर्वात जलद द्विशतक - HDR

52 चेंडू - वैभव सूर्यवंशी, भारत 'ए' विरुद्ध यूएई, 2026

103 चेंडू - चॅड बोव्स, कॅंटरबरी विरुद्ध ओटागो, क्राइस्टचर्च, 2024

114 चेंडू - एन. जगदीसन, तामिळनाडू विरुद्ध अरुणाचल, बंगळूर, 2022

114 चेंडू, हॅरी ब्रूक, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, रावळपिंडी, 2026

Vaibhav Suryavanshi
Fact Check: खासगी रुग्णालयात आयुष्मान कार्ड बंद? मोफत उपचार मिळणार नाही?

एका डावात सर्वाधिक षटकार - HDR

28 वैभव सूर्यवंशी, भारत 'ए' विरुद्ध यूएई, 2026

26 तन्मय अग्रवाल, हैदराबाद विरुद्ध अरुणाचल, हैदराबाद, 2024 (रणजी)

23 कॉलिन मुन्रो, ऑकलंड विरुद्ध सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स, नेपियर, 2015 (प्लंकेट शील्ड)

23 डार्सी शॉर्ट, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वीन्सलँड, सिडनी, 2018 (वन डे कप)

Vaibhav Suryavanshi
Stamp Duty Rule: मुलगा-मुलगी किंवा पत्नीच्या नावावर मालमत्ता करताय? दानपत्रासाठी आता भरावे लागणार ५०० रुपये शुल्क

कतारच्या दोहामधील तुफानी खेळीनंतर वैभववर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. वैभवनं गेल्या काही काळापासून आपल्या कौशल्यानं क्रिकेट विश्वात ठसा उमटवलाय. याआधी वैभवानं यंदाच्या आयपीएलच्या हंगामात 36 चेंडूत शतक, सर्वाधिक 776 धावा आणि तब्बल 65 षटकार मारलेत. तसंच, विजय हजारे ट्रॉफीत 190 आणि अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये 175 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत नवा विश्वविक्रम करून वैभवनं पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.