Stamp Duty Rule: मुलगा-मुलगी किंवा पत्नीच्या नावावर मालमत्ता करताय? दानपत्रासाठी आता भरावे लागणार ५०० रुपये शुल्क

Stamp Duty Rule: महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क नियमांत बदल करण्यास मंजुरी दिली. दानपत्रासाठी ५०० रुपये, अपीलसाठी १ हजार रुपये शुल्क आणि परताव्यासाठी आता एक वर्षाची मुदत मिळणार आहे.
Stamp Duty Rule
Stamp Duty RuleSaam TV
Published On: 

Stamp Duty Rule: महाराष्ट्र सरकारने मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दानपत्र करण्यासाठी आता २०० रुपयांऐवजी ५०० रुपये मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच अपील करण्याचे शुल्कही वाढवण्यात आले आहे. दुसरीकडे, मुद्रांक शुल्क परतावा मिळवण्यासाठी अर्ज करण्याची मुदत सहा महिन्यांऐवजी एक वर्ष करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या बदलांना मंजुरी देण्यात आली.

दानपत्रासाठी आता ५०० रुपये द्यावे लागणार

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार घर किंवा शेतीची मालमत्ता पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात किंवा मृत मुलाच्या पत्नीच्या नावावर दानपत्र केल्यास आता ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी यासाठी २०० रुपये शुल्क होते. म्हणजेच दानपत्राच्या शुल्कात ३०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Stamp Duty Rule
Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; १० हजारांचे तिकीट काढून घुसले अन् ४.३ लाखांची केली चोरी

अपील करण्यासाठी आता १ हजार रुपये

मुद्रांक शुल्कासंदर्भात काही तक्रार किंवा आक्षेप असल्यास अपील करता येते. यासाठी आधी ३०० रुपये शुल्क द्यावे लागत होते. आता महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) अंतर्गत अपील करण्यासाठी १ हजार रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच अपील शुल्कात ७०० रुपयांची वाढ झाली आहे.

Stamp Duty Rule
Phulwara Movie: नऊवारी साडी, ठसकेबाज अदाकारी अन् लावणीचा साज; 'फुलवरा'मध्ये वैदेही-प्रियदर्शिनींचा मराठमोळा अंदाज

मुद्रांक शुल्क परताव्यासाठी एक वर्षाची मुदत

मुद्रांक खरेदी केल्यानंतर त्याचा वापर झाला नाही आणि परतावा हवा असल्यास अर्ज करता येतो. यापूर्वी असा अर्ज करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत होती. मात्र, आता ही मुदत वाढवून एक वर्ष करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना परताव्यासाठी अर्ज करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

नवीन नियमांसाठी विधेयक मांडणार

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ३२ (ब), ५३ (१अ) आणि ५२ मध्ये बदल करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या बदलांची अंमलबजावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.