Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; १० हजारांचे तिकीट काढून घुसले अन् ४.३ लाखांची केली चोरी

Diljit Dosanjh Concert: दिलजीत दोसांझच्या अहमदाबाद कॉन्सर्टमध्ये दोन आरोपींनी ११ मोबाईल फोन चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, जप्त केलेल्या मोबाईलची किंमत ४.३० लाखांपेक्षा अधिक आहे.
Diljit Dosanjh
Diljit DosanjhSaam Tv
Published On: 

Diljit Dosanjh Concert: पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याची क्रेझ चाहत्यांमध्ये प्रचंड आहे. त्याच्या कॉन्सर्टला मोठ्या संख्येने चाहते उपस्थित राहतात. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादमध्ये आयोजित दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दोन व्यक्तींनी तब्बल ११ महागडे मोबाईल फोन चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची किंमत ४.३० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

५ हजारांचे गोल्ड पास खरेदी करून कॉन्सर्टमध्ये प्रवेश

ही घटना शनिवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दिलजीत दोसांझच्या 'ऑरा इंडिया टूर' कॉन्सर्टदरम्यान घडली. आरोपींनी प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीचे गोल्ड पास खरेदी केले होते. कॉन्सर्टमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी गर्दीचा फायदा घेत प्रेक्षकांचे मोबाईल फोन चोरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ओळख ३६ वर्षीय मोहम्मद असद मोहम्मद गुलझार आणि २४ वर्षीय अश्रफ हुसेन नूर हुसेन इद्रिसी अशी झाली आहे. हे दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांनी गर्दीत सहज मिसळता यावे यासाठी डोक्यावर पागडी घातली होती.

Diljit Dosanjh
Kaun Banega Crorepati 18: मराठमोळ्या भूषण ठाकरेचं नशीब फळफळलं! २४ रुपये बँकेत असताना जिंकले १ कोटी, आईसाठी घेतला मोठा निर्णय

कॉन्सर्ट संपताच पोलिसांनी केली अटक

दिल्लीतील काही व्यक्ती कॉन्सर्टमध्ये मोबाईल चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याची गुप्त माहिती अहमदाबाद पोलिसांच्या झोन-२ अंतर्गत येणाऱ्या लोकल क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या प्रवेशद्वारांवर आणि परिसरात पाळत ठेवली. कॉन्सर्ट संपल्यानंतर आरोपी चोरी केलेले मोबाईल घेऊन स्टेडियममधून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्याकडून ॲपल आणि सॅमसंगसारख्या महागड्या ब्रँडचे ११ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या सर्व फोनची अंदाजित किंमत ४.३० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Diljit Dosanjh
Marathi Serial Off Air: अवघ्या २ वर्षांत लोकप्रिय मालिकेचा प्रवास संपणार? अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण

आतापर्यंत ८ जणांच्या तक्रारी

या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांनी त्यांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या आहेत. नवव्या मोबाईलच्या मालकाचीही ओळख पटली आहे. तर उर्वरित दोन मोबाईलच्या मालकांचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मोटेरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचा पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.