Kaun Banega Crorepati 18: मराठमोळ्या भूषण ठाकरेचं नशीब फळफळलं! २४ रुपये बँकेत असताना जिंकले १ कोटी, आईसाठी घेतला मोठा निर्णय

Kaun Banega Crorepati 18: कौन बनेगा करोडपतीच्या १८ व्या पर्वात भूषण ठाकरेने एक कोटी रुपये जिंकले. आईचे विकलेले दागिने पुन्हा खरेदी करण्याचे आणि आई-वडिलांना सुख देण्याचे त्याचे स्वप्न जाणून घ्या.
Kaun Banega Crorepati 18
Kaun Banega Crorepati 18Saam TV
Published On: 

Kaun Banega Crorepati 18: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'च्या १८ व्या पर्वाला पहिला करोडपती मिळाला आहे. मराठमोळ्या भूषण ठाकरेने या शोमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहे. विशेष म्हणजे, भूषणसाठी १ कोटी जिंकणे केवळ पैशांपुरता मर्यादित नाही. तर, आपल्या आई-वडिलांना आर्थिक संकटातून बाहेर काढणे आणि त्यांच्या कष्टाचे चीज करणे, हे सर्वात मोठे स्वप्न आहे. एकेकाळी बँक खात्यात अवघे २४ रुपये असलेल्या भूषणने थेट अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसून एक कोटी रुपये जिंकण्यापर्यंत मजल मारली आहे.

अमिताभ बच्चन यांनी भूषणला शांत केलं

'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत भूषणने आपल्या संघर्षाचा प्रवास सांगितला. अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसल्यानंतर सुरुवातीला तो प्रचंड दडपणाखाली होता. त्याला नीट बोलताही येत नव्हते. मात्र, अमिताभ बच्चन यांनी त्याची अवस्था ओळखली. त्यांनी लगेच प्रश्न विचारण्याऐवजी भूषणच्या कुटुंबाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल संवाद साधला. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि तो खेळासाठी तयार झाला.

Kaun Banega Crorepati 18
Marathi Serial Off Air: अवघ्या २ वर्षांत लोकप्रिय मालिकेचा प्रवास संपणार? अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण

आई-वडिलांना रोजंदारीच्या कामातून मुक्त करणार

एक कोटी रुपये जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी भूषणला मिठी मारली. हा क्षण त्याच्यासाठी अविस्मरणीय होता. त्यावेळी त्याच्या डोळ्यांसमोर आई-वडिलांनी केलेला संघर्ष होता. अमिताभ बच्चन यांनी त्याला वडिलांना पुन्हा रोजंदारीवर काम करू देऊ नकोस, कुटुंबाची जबाबदारी स्वीकार आणि आई-वडिलांना आराम करू दे, असा मोलाचा सल्ला दिला.

आईचे विकलेले दागिने पुन्हा खरेदी करणार

भूषणच्या आयुष्यातील सर्वात भावनिक गोष्ट म्हणजे त्याच्या आईने शिक्षणासाठी स्वतःचे दागिने विकले होते. मुलाचे शिक्षण थांबू नये म्हणून आईने वेळोवेळी दागिने विकून त्याला आर्थिक मदत केली. त्यामुळे आता एक कोटी रुपये जिंकल्यानंतर सर्वात आधी आईचे विकलेले दागिने पुन्हा खरेदी करण्याची त्याची इच्छा आहे. आईला तिचे सर्व दागिने परत देण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याचा आनंद त्याला आहे.

Kaun Banega Crorepati 18
१०० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; पुण्यात होणार शतकमहोत्सवी संमेलन

नातेवाईकांच्या वागण्यातही झाला बदल

भूषणने सांगितले की, पूर्वी मला एक हजार रुपयांची गरज असतानाही काही नातेवाईक मदत करण्यास नकार देत होते. मात्र, आता एक कोटी रुपये जिंकल्यानंतर तेच लोक फोन करून त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या यशामुळे गावाचे आणि जिल्ह्याचे नाव मोठे झाल्याचे सांगत आहेत.दरम्यान, एक कोटी रुपये जिंकल्यानंतर भूषणसमोर सात कोटी रुपयांचा प्रश्न होता. मात्र, त्याने एक कोटींच्या यशावर समाधान मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.