Marathi Serial Off Air: अवघ्या २ वर्षांत लोकप्रिय मालिकेचा प्रवास संपणार? अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण

Marathi Serial Off Air: झी मराठीची 'तुला जपणार आहे' मालिका बंद होणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री महिमा म्हात्रेच्या भावनिक पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले असून शेवटच्या भागाबाबत उत्सुकता वाढली आहे.
Zee Marathi serial Tula Japnar Aahe is goning off air
Zee Marathi serial Tula Japnar Aahe is goning off airSaam Tv
Published On: 

Marathi Serial Off Air: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सध्या अनेक नवनवीन बदल पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या भेटीला नवीन मालिका येत असताना काही जुन्या मालिकांना मात्र निरोप घ्यावा लागत आहे. अशातच झी मराठी वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेबाबत महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता हर्षद अतकरी यांची प्रमुख भूमिका असलेली 'येतेच आता मी नांदायला' ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या मालिकेच्या आगमनामुळे कोणती जुनी मालिका बंद होणार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

'देवमाणूस' मालिकेच्या वेळेत बदल

झी मराठीवर येत्या ३० नोव्हेंबरपासून 'येतेच आता मी नांदायला' ही नवीन मालिका सुरू होणार आहे. रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे या वेळेत सध्या प्रसारित होणारी 'देवमाणूस' मालिका बंद होणार, असा अंदाज प्रेक्षकांकडून व्यक्त केला जात होता. मात्र, वाहिनीने 'देवमाणूस' मालिकेच्या वेळेत बदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता किरण गायकवाड याची प्रमुख भूमिका असलेली 'देवमाणूस' ही मालिका आता येत्या सोमवारपासून रात्री १०:३० वाजता प्रसारित केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे ही मालिका बंद होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Zee Marathi serial Tula Japnar Aahe is goning off air
१०० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; पुण्यात होणार शतकमहोत्सवी संमेलन

'तुला जपणार आहे' मालिका घेणार निरोप?

दरम्यान, रात्री १०:३० वाजता प्रसारित होणारी 'तुला जपणार आहे' ही मालिका आता बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या मालिकेतील मीरा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे हिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. महिमाने मालिकेच्या सेटवरून एक सेल्फी फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने 'आज काहीतरी वेगळं वाटतंय' असे भावनिक कॅप्शन दिले आहे. यासोबतच तिने हार्ट आणि डोळ्यांत अश्रू असलेले इमोजी देखील लावले आहेत. त्यामुळे अभिनेत्रीने मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाची ही पोस्ट शेअर केली असावी, असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Zee Marathi serial Tula Japnar Aahe is goning off air
Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टला बॉम्बनं उडवून टाकू; पंजाबी पॉपस्टार खलिस्तानीच्या निशाण्यावर

२७ नोव्हेंबरला शेवटचा भाग?

मिळालेल्या माहितीनुसार, 'तुला जपणार आहे' मालिकेचा शेवटचा भाग २७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत मालिकेच्या कलाकारांकडून किंवा झी मराठी वाहिनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मालिका खरोखरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की तिच्या वेळेत काही बदलणार आहे याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रश्न पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.