Gautam Gambhir : रोगापेक्षा इलाज भयंकर, टीम इंडियाची अवस्था इतकी 'गंभीर' का झाली?

Gautam Gambhir controversy: न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारताला सलग पराभवांचा सामना करावा लागला आहे. अनुभवी खेळाडूंना डावलणे, अस्थिर बॅटिंग ऑर्डर आणि निवड प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. भारतीय संघाच्या खराब कामगिरीचे कारण काय? सविस्तर विश्लेषण जाणून घ्या
Gautam Gambhir
Gautam GambhirSaam Tv
Published On

Is Gautam Gambhir responsible for India’s recent cricket failures? भारतीय संघाचा मायदेशात लागोपाठ दुसर्‍या मालिकेत विराट असा पराभव झालाय. होय, कारण आधी न्यूझीलंडने ३-० आणि आता दक्षिण आफ्रिकेने २-० ने भारताचा सुपडा साफ केला. मायदेशात आतापर्यंत भारतीय संघ इतका दुबळा कधीच वाटला नाही. एकवेळ भारतीय संघ मायदेशात आणि विदेशातही वर्चस्व राखत होता. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या तगड्या संघाला मायदेशात ३-३ दिवसात धूळ चारत होता. पण आताची स्थिती काय? भारतीय संघ संक्रमणातून जातोय, पण मायदेशात अशी अवस्था होणं, म्हणजे हे गंभीरच आहे.

यानिमित्ताने भारताच्या पराभवाला गौतम गंभीर जबाबदार आहे का? असा प्रश्न विचारला जोतय. होय, गौतम गंभीर याच्यामुळेच भारतीय संघाला मायदेशात आणि विदेशात पराभवाचा सामना करावा लागलाय. भारतीय संघाचे गेल्या काही वर्षांतील रेकॉर्डस पाहिल्यानंतर तुम्हाला यावर विश्वास बसेल. भारतीय संघ फक्त कसोटीच नव्हे तर वनडे, टी२० मध्येही मान टाकत असल्याचे दिसतेय. विराट कोहली, रोहित शर्मा, अश्विन, पुजारा अन् अजिंक्य रहाणे यासारख्या दर्जेदार खेळाडूंना रामराम करायला लावला (असे म्हणतात) खरा, पण त्यांच्याशिवाय खेळण्याची तयारी होती का? गेल्या काही दिवसांच्या कामगिरीवरून तर दिसत नाही. कारणे, जाणून घेण्याआधी भारतीय संघाची गेल्या काही दिवसातील कामगिरी पाहूयात..

Gautam Gambhir
Badlapur-Karjat : बदलापूर-कर्जतसाठी मोदींनी घेतला मोठा निर्णय, लोकल प्रवास होणार सुसाट, मुंबई-पुणेकरांसाठीही फायदा
  • २७ वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली

  • ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत पहिल्यांदाच ३० विकेट गमावल्या

  • ४५ वर्षांनंतर एका कॅलेंडर वर्षात वनडेत एकही विजय मिळवता आला नाही

  • ३६ वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली

  • १९ वर्षांनंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी सामना गमावला

  • घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५० पेक्षा कमी धावसंखेवर ऑलआऊट

  • न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना गमावला

  • १२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली

  • सलग दोन कसोटी मालिका घरच्या मैदानावर गमावल्या

  • १२ वर्षांनंतर वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना गमावला

  • घरच्या मैदानावर २०० पेक्षा कमी लक्ष्याचा पाठलाग पहिल्यांदाच अपयशी ठरला

  • घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पहिल्यांदा क्लीन स्वीप (व्हाईटवॉश) झाला

  • १३ वर्षांनंतर मेलबर्नमध्ये कसोटी सामना गमावला

  • १० वर्षांनंतर सलग दोन कसोटी मालिका गमावल्या

  • १० वर्षांनंतर बॉर्डर-गावसकर चषक गमावला

  • १२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी मालिकेत ३ सामन्यांमध्ये पराभव पत्करला

  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकलो नाही

  • इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे ५ शतके झळकावूनही कसोटी सामना गमावणारी पहिली संघ ठरला

  • लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध २०० पेक्षा कमी लक्ष्याचा पाठलाग दुसर्‍यांदा अपयशी ठरला

  • ११ वर्षांनंतर मँचेस्टरमध्ये कसोटी सामन्यात ६००+ धावा दिल्या

  • १७ वर्षांनंतर अॅडलेडमध्ये वनडे सामना गमावला

  • घरच्या मैदानावर १२४ धावांच्या नीचांकी लक्ष्याचा पाठलाग अपयशी ठरला

  • १५ वर्षांनंतर ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना गमावला

  • दक्षिण आफ्रिकेने २-० ने पराभव केला.

  • मायदेशात पहिल्यांदाच ४०० पेक्षा जास्त धावांनी सामना गमावला

  • घरच्या मैदानावर सलग दुसरा व्हाईटवॉश (०-२)

Gautam Gambhir
Beed : बीडचे बिहार झाले! राष्ट्रवादीच्या नेत्यावर १५ जणांचा हल्ला; कार फोडली, बेदम मारहाण

अस्थिर बॅटिंग ऑर्डर -

टीम इंडियात कोणत्याही फलंदाज एका निश्चित क्रमांकावर फलंदाजीला येत असल्याचे दिसत नाही. वारंवार फलंदाजीच्या क्रमांकात बदल केला जातो. वनडे, टी२० असो की कसोटी.. कोणत्याही ठिकाणी बॅटिंग ऑर्डर फिक्स दिसत नाही. उदाहरण घ्यायचे तर.... वॉशिंग्टन सुंदर याला पहिल्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर उतरवले तर दुसऱ्या कसोटीत तो सातव्या-आठव्या क्रमांकावर आला. वनडे आणि कसोटीत काही वेगळी स्थिती नाही.

संघाची निवड -

कसोटीतील पराभवामागे खेळाडूंची निवड हेही एक कारण आहे. कारण संघात कसोटी स्पेशालिस्ट फलंदाजांची कमतरता दिसतेय. अष्टपैलूंचा भरणा केलाय. त्यामुळे गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाजू कमकुवत झाल्याचे दिसतेय. कसोटी जिंकयाची असेल तर तुम्हाला २० विकेट घ्याव्याच लागतात, पण फलंदाजी मजबूत करण्याच्या प्रयत्नात गंभीरने अष्टपैलू खेळाडू जास्त खेळवण्याचा अट्टाहास केला अन् तिथेच डाव फसला. आयपीएलचा ट्रेंड भारतीय संघात आणण्याचा गंभीरचा प्रयोग आतापर्यंत फसलेला दिसतेय. कारण आतापर्यंत सर्वच ठिकाणी त्याला अपयश आले.

Gautam Gambhir
Local Body Election : काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

अनुभवाची कमतरता, नव्या खेळाडूंवर जास्त दबाव -

विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि आर अश्विन यासारखे दिग्गज खेळाडू संघाबाहेर गेले. पण त्यांची जागा घेणारे तितके प्रभावी नाहीत. आपण संक्रमणातून जातोय, पण याचा अर्थ आपण घरात हरायला हवे, हेही मान्य नाही, असे चेतेश्वर पुजाराने म्हटले. त्याच्या या शब्दात दम आहे. कारण, टीम इंडियाचे क्रिकेट अजूनतरी इतके खालच्या पातळीवर आले नाही, की कोणताही संघ भारताला भारतात हरवू शकतो. मग नेमकं चुकलं काय? तर अनुभवी खेळाडूंची कमतरता दिसतेय.

Gautam Gambhir
Accident : लग्नाहून येताना पूलावरून नदीत कोसळली कार, ५ जणांचा जागेवरच मृत्यू

गांगुली, सचिन तेंडुलकर, धोनी यासारख्या दिग्गजांना जाताना आपला उत्तराधिकारी तयार केला. तशी प्रोसेस झाली, कोणत्याही घाईगडबडीत निवृत्त झाले नाहीत. धोनीच्या हाताखाली विराट-रोहितसारखे हिरे घडले. धोनीसाठी सचिन-गांगुली सल्लागार होतेच. पण आता शुभमन गिल याला सल्ला देण्यासाठी कुणीच नाही. मोहम्मद कैफ याने गिल याच्या नेतृत्वावर बोलताना महत्त्वाचे वक्तव्य केले होते. शुभमन गिल भविष्यातील नक्कीच स्टार खेळाडू असेल. पण त्याला आताच सगळे देऊन दबाव देण्यात अर्थ नाही. कैफ याच्या या वक्तव्याचा अर्थ तुम्हाला समजला असेलच. विराट आणि रोहित शर्मा यांना आणखी काही दिवस कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी द्यायला हवी होती. बीसीसीआयकडून त्यांच्यासोबत बोलणं ठेवायला हवं होतं. सचिन तेंडुलकर ४० व्या वर्षांपर्यंत कसोटी क्रिकेट खेळत होता.. विराट आणि रोहित शर्मा यांचे फिटनेस जबरदस्त आहे. आणखी २ वर्षांपर्यंत नक्कीच ही जोडी खेळली असती अन् गिल चांगला तयार झाला असता.

Gautam Gambhir
Heartbreaking! अर्ध्या तासात विधवा झाली, लग्नमांडवात नवरदेवाला हार्टअटॅकचा झटका, लग्न सोहळ्यात शोककळा

पक्षपातीपणाचा आरोप -

आपल्या आवडत्या खेळाडूंनाच संघात स्थान द्यायचे, हा ट्रेंड आलेला आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. गेल्या काही दिवसात हर्षित राणा याने तिन्ही प्रकारच्या फॉर्मेटमध्ये पदार्पण केलेय. त्याच्यामधील क्षमता असेलही पण हीच वेळ आहे. आयपीएलमध्ये खेळल्यामुळे त्याला स्थान दिलेय का? आपल्याकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा, विकेट घेणारे खेळाडू अजून वेटिंगवरच आहेत. हर्षित आणि साई सुदर्शन यासारख्या खेळाडूंना संधी का मिळतेय. सरफराज खान याला का डावलले जातेय? त्याने नेमकी चूक कुठे केली? मोहम्मद शामी यालाही स्थान नाही. विराट-रोहित सारख्या दिग्गजांना भविष्याचा विचार करून निवृत्ती घ्यायला लावल्याची चर्चा आहे. मोहित कंबोज, अभिनव ईश्वरन यांच्यासारखे अनेक खेळाडू दार ठोठावत आहेत.

Gautam Gambhir
Pune : महिलेचा पुरूषावर बलात्कार, अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, पुण्यात खळबळजनक घटना

बीसीसीआय माझ्या भविष्याचा निर्णय घेईल. टीम इंडिया सर्वात महत्त्वाची आहे, गंभीर नाही, असे म्हणत गौतम गंभीर याने आपल्यावरील टीकेला उत्तर दिलेय. क्रिकेटमध्ये टीमच्या भविष्याचे निर्णय घेतले जातात. इंग्लंडमध्ये रिझल्ट दाखवून दिला, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली, आशिया कप जिंकून दिला.. असे गंभीर म्हणाला. आता गौतम गंभीर याच्याबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार , याची उत्सुकता लागली आहे. गौतमला आणखी एक संधी मिळेलच, असा कयास बांधला जातोय.

Gautam Gambhir
BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com