

बदलापूर–कर्जत ३२ किमी तिसरी आणि चौथी मार्गिका प्रकल्पाला केंद्र सरकारनं १,३२४ कोटी रुपयांची मंजुरी दिली.
या मार्गिकेमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढून प्रवासातील गर्दी कमी होणार आहे.
मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान होऊन अधिक प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या चालवणे शक्य होणार आहे.
प्रकल्पामुळे औद्योगिक वाढ, रोजगार, डिझेल बचत आणि कार्बन उत्सर्जनात मोठी घट अपेक्षित आहे.
Badlapur-Karjat 3rd & 4th line project : बदलापूर-कर्जत प्रवास करणाऱ्यांना केंद्राने मोठं गिफ्ट दिलेय. या मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च १,३२४ कोटी रूपये इतका असेल. हा प्रकल्प झाल्यास बलदापूर-कर्जत प्रवास करणाऱ्यांना फायदाच फायदा होणार आहे. त्याशिवाय मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांचा वेळही वाचणार आहे. हा प्रकल्प नेमका आहे का? याचा काय फायदा होणार? याबाबत जाणून घेऊयात... (Benefits of Badlapur–Karjat 3rd and 4th railway line project)
बदलापूर – कर्जत 32 किलोमीटरचया तिसरी आणि चौथ्या मार्गिकेला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. या विस्तारीत मार्गिकेच्या क्षमतेमुळे रेल्वे वाहतुकीचा वेग आणि व्याप्तीमध्ये वाढ होणार आहे. वाहतूक कोंडी कमी व्हायलाही मदत होऊ शकेल. बदलापूर – कर्जत विभाग हा या प्रकल्पांतर्गतचा मुंबई उपनगरीय कॉरिडॉरचा एक भाग आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरीय भागातील दळणवळणीय जोडणीत सुधारणा घडून येईल, तसेच प्रवाशांच्या दृष्टीने भविष्यातील मागणीही पूर्ण करता येईल, यासोबतच यामुळे दक्षिण भारतासोबतच्या दळणवळणीय जोडणीची सुविधाही मिळू शकेल. (Details of 32 km Badlapur–Karjat quadruple line features)
वैशिष्ट्ये काय आहेत?
बदलापूर – कर्जत हा मार्ग मुंबई-चेन्नई हाय डेन्सिटी नेटवर्कचा भाग असून पश्चिम भारत व दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मुंबई उपनगरीय रेल्वे अर्थात लोकल जाळ्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे कल्याण-कर्जत मार्गावरील गर्दी कमी होईल. बदलापूर – कर्जत हा ३२ किलोमीटर लांबीचा मार्ग असून त्यावर ८ मोठे पूल, १०६ लहान पूल, १ रोड अंडर ब्रिज आणि ६ स्थानके आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत १,३२४ कोटी रूपये आहे. रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये ५०:५० प्रमाणात विभागली जाणार आहे.
बदलापूर – कर्जत तिसरी आणि चौथी मार्गिका तयार झाल्यास मुंबई लोकलने दररोज प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे. त्याशिवाय मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवाशांची सोय होईल. अधिक प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या चालवण्यास मदत होईल. या परिसरातील औद्योगिक वाढीमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. दरवर्षी अतिरिक्त ७.२ दशलक्ष टन मालवाहतूक वाढण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी ४१ लाख लिटर डिझेलची बचत होऊन लॉजिस्टिक खर्चात रु. ४६.२ कोटींची बचत होईल. दरवर्षी २ कोटी किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होईल, हे ८ लाख झाडे लावण्याइतके आहे.
32 किलोमीटर लांबीच्या बदलापूर – कर्जत तिसरी आणि चौथ्या मार्गिकेच्या क्षमतेमुळे रेल्वे वाहतुकीचा वेग आणि व्याप्तीमध्ये वाढ होणार आहे. वाहतूक कोंडी कमी व्हायलाही मदत होऊ शकेल. या प्रकल्पा़ंची आखणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवीन भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून केली गेली आहे. यामुळे या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल आणि इथल्या लोकांसाठी रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.