

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशिवाय महाविकास आघाडीची सत्ता कठीण आहे... त्यामागचं समीकरण नेमकं काय आहे? मनसे मुंबई महापालिका निवडणुकीत कशी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे... पाहूयात यावरचा खास रिपोर्ट...
मुंबई महापालिकेसाठी मारझोड करणाऱ्या मनसेसोबत जाणार नाही, अशी थेट भूमिकाच काँग्रेसनं घेतली आणि मविआ फुटण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र मुंबईत मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय.... मुंबईत 4 टक्के मतदार मनसेच्या पाठीशी असले तरी 22 प्रभागात मनसेचा मोठा प्रभाव आहे.... तर अनेक ठिकाणी भाजप आणि मविआतील उमेदवारांच्या मतांचा फरक शेकड्यात असताना मनसेच्या मतांची संख्या 2 ते 6 हजार असल्याचं डेटा विश्लेषणातून समोर आलंय... मात्र कोणत्या भागात मनसेचा प्रभाव आहे? पाहूयात...
खरंतर 2017 मध्ये मनसेनं बीएमसीच्या सर्वच जागांवर निवडणूक लढवली होती.. मात्र त्यापैकी मराठी भाषिक पट्ट्यातील 7 जागा मनसेनं जिंकल्या होत्या.. आता मनसेशिवाय महाविकास आघाडीने निवडणूक लढवल्यास त्याचा भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केलीय...
महाविकास आघाडीने मनसेला सोबत न घेतल्यास महाविकास आघाडीला 94 जागाच मिळणार तर महायुती 133 जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे.. त्यामुळे मविआला बहुमताचा 114 आकडा गाठणं कठीण होण्याची शक्यता आहे.
हे असं असलं तरी मनसे महाविकास आघाडीसोबत एकत्र लढल्यास मात्र महायुतीचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे... ते नेमकं कसं? पाहूयात....
मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडी 116 जागा जिंकण्याची शक्यता आहे... तर महायुतीला 111 जागा मिळण्याची शक्यता आहे...त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय...
आता विश्लेषकांनी मांडलेल्या आकडेवारीचा दाखला देत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मात्र स्वपक्षालाच कोपरखळी लगावलीय... तर वर्षा गायकवाडांनी विश्लेषकांचा दावा फेटाळून लावलाय...
दुसरीकडे युती-आघाडीमुळे घटकपक्षांचा फायदाच होतो, असं सांगत मनसेनं आघाडीबाबत आशावाद व्यक्त केलाय. 2019 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिन्न विचारधारा असलेल्या शिवसेनेसोबत काँग्रेस सत्तेत सहभागी झाला.. त्याप्रमाणे आता राजकीय अपरिहार्यता म्हणून का होईना अंकगणिताचा विचार करुन काँग्रेस मनसेला सोबत घेणार का? याबाबत उत्सुकता लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.