ICC Player of the Month: आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारावर टीम इंडियाची छाप; शुभमन गिल आणि शेफाली वर्माची निवड

ICC September Awards: आयसीसीच्या सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार शुभमन गिल आणि शेफाली वर्माने जिंकले. गिलने पाचव्यांदा हा पुरस्कार पटकावला, तर शेफालीने फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली.
ICC Player of the Month
ICC Player of the Monthsaam tv
Published On: 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्हीमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी बाजी मारलीये. पुरुष गटात भारताचा टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिल याला हा पुरस्कार मिळाला आहे. तर महिलांमध्ये भारताची ओपनर फलंदाज शेफाली वर्मा हिने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे.

शुभमन गिलने पाचव्यांदा पटकावला पुरस्कार

सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी शुभमन गिलसोबत भारताचा अभिषेक शर्मा आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांचीही निवड झाली होती. मात्र गिलने त्याच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर या दोघांनाही मागे टाकले.

ICC Player of the Month
Ajit Agarkar: अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला; नवा सिलेक्टर कोण होणार? BCCI ने मागवले अर्ज

सप्टेंबर महिन्यात गिलने भारताकडून दोन वनडे सामने खेळले. या दोन्ही सामन्यांत त्याने अनुक्रमे ११० आणि २२३ रन्सची खेळी केली. गुवाहाटीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना गिलने २२३ रन्स केले होते. वनडे क्रिकेटमध्ये रन्सचा पाठलाग करताना केलेली ही सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ठरली. विशेष म्हणजे त्याने अवघ्या ११७ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावण्याचाही विक्रम केला.

गिलने आतापर्यंत पाचव्यांदा आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकलाय. याआधी त्याने जानेवारी २०२३, सप्टेंबर २०२३, फेब्रुवारी २०२५ आणि जुलै २०२५ मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. त्यामुळे सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणारा तो पुरुष क्रिकेटपटू ठरलाय. पाकिस्तानचा बाबर आझम याने आतापर्यंत तीन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

ICC Player of the Month
Mumbai Ranji team: सिद्धेश लाडच्या नेतृत्वात मुंबईचं रणजी मिशन सुरू; 43व्या विजेतेपदासाठी टीम मैदानात उतरणार

शेफाली वर्माची फलंदाजीसोबत गोलंदाजीतही चमक

महिलांमध्ये गटात शेफाली वर्माने श्रीलंकेची चमारी अटापट्टू आणि भारताचीच श्री चरणी यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. सप्टेंबर महिन्यात टीम इंडियाने आशिया कप जिंकला होता. त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताने गोल्ड मेडल पटकावलंय. या दोन्ही स्पर्धांमध्ये शेफालीने महत्त्वाची कामगिरी केली.

सप्टेंबरमध्ये खेळलेल्या सात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत शेफालीने एकूण ३६० रन्स केलेत. या काळात तिची सरासरी ७२ होती, तर तिचा स्ट्राइक रेट १८५ इतका होता. तिने दोन अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं होतं.

ICC Player of the Month
IND vs SL ODI Fact Check: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार? व्हायरल सत्य

आशिया कपच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम सामन्यात शेफालीने अर्धशतकं केली. तर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिने १०० रन्सची शतकी खेळी केली. केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही तिने आपली ताकद दाखवली. या काळात शेफालीने सहा विकेट्स घेतल्या. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर केलेल्या या उत्तम कामगिरीमुळे शेफालीला सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com