Ajit Agarkar: अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला; नवा सिलेक्टर कोण होणार? BCCI ने मागवले अर्ज

Ajit Agarkar tenure: अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर BCCI ने भारतीय क्रिकेट निवड समितीतील नव्या सदस्यासाठी अर्ज मागवले आहेत. पात्रता, निवृत्तीनंतरचा पाच वर्षांचा कूलिंग ऑफ कालावधी, अर्जाची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रियेबाबत जाणून घ्या.
Ajit Agarkar
Ajit Agarkarsaam tv
Published On: 

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे माजी प्रमुख निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ आता संपला आहे. आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) निवड समितीतील एका जागेसाठी नवीन सदस्याची निवड करण्याची प्रक्रिया सुरू केलीये. यासाठी बीसीसीआयने मंगळवारी अर्ज मागवले आहेत.

सध्या भारतीय टीमच्या निवड समितीत प्रज्ञान ओझा, आरपी सिंह, शिवसुंदर दास आणि अजय रात्रा हे चार सदस्य आहेत. अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रज्ञान ओझा सध्या अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहत आहेत.

Ajit Agarkar
Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावुक पोस्ट करत दिली माहिती

निवड समितीतील नव्या सदस्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही प्रकारांसाठी टीम इंडियाची निवड करताना या सदस्याचा सहभाग असेल. टीममधील खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी निवड समितीवर असते.

आगरकर यांनी जुलै 2023 मध्ये पदभार स्वीकारला

अजित आगरकर यांनी जुलै 2023 मध्ये भारतीय क्रिकेट टीमच्या मुख्य सिलेक्टर्सची जबाबदारी स्वीकारली होती. रिपोर्ट्सनुसार, त्यांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबर 2026 रोजी संपला आहे. गेल्या काही महिन्यांत आगरकर हे रोहित शर्माशी संबंधित चर्चांमुळेही चर्चेत होते. 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या नियोजनातून रोहित शर्माला बाहेर ठेवण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

Ajit Agarkar
Abhishek Sharma: ‘माझं एकच ध्येय...’ अभिषेक शर्माच्या या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष, नेमकं काय म्हणाला?

निवड समितीतील मुख्य सिलेक्टर्सची निवड करताना एक महत्त्वाचा नियम आहे. समितीतील ज्या सदस्याकडे सर्वाधिक टेस्ट सामने खेळण्याचा अनुभव असतो त्याला मुख्य सिलेक्टर म्हणजेच चीफ सिलेक्टर बनवण्यात येतं.

नव्या सदस्यासाठी काय आहेत पात्रता?

बीसीसीआयने निवड समितीतील या जागेसाठी काही पात्रता निश्चित केल्या आहेत. अर्ज करणाऱ्या माजी क्रिकेटपटूने खालीलपैकी कोणतीही एक अट पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.

  • कमीत कमी 7 टेस्ट सामने खेळलेले असावेत.

  • किंवा 30 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.

  • किंवा 10 वनडे सामने आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.

याशिवाय अर्ज करणाऱ्या खेळाडूला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर किमान 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असणं गरजेचं आहे. त्यामुळे दिलेल्या तीनपैकी एक पात्रता पूर्ण करण्याबरोबरच निवृत्तीनंतरचा 5 वर्षांचा कूलिंग ऑफ कालावधी पूर्ण झालेला असणं अनिवार्य आहे.

14 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज

बीसीसीआयने या नव्या जागेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवली आहे. अर्ज आल्यानंतर बीसीसीआयकडून प्रथम त्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी तयार करून त्यातील निवडक उमेदवारांना इंटरव्यूसाठी बोलवण्यात येणार आहे.

Ajit Agarkar
टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

पुढचं एक वर्ष निवड समितीसाठी महत्त्वाचं

टीम इंडियाच्या निवड समितीसमोर पुढचं एक वर्ष खूप महत्त्वाचं असणार आहे. 2027 च्या वनडे वर्ल्ड कपची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात टीममधील योग्य खेळाडूंची निवड करून मजबूत टीम तयार करण्याची जबाबदारी निवड समितीवर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com