Abhishek Sharma: ‘माझं एकच ध्येय...’ अभिषेक शर्माच्या या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष, नेमकं काय म्हणाला?

Abhishek Sharma statement: भारत-वेस्ट इंडिज टी-20 सिरीजपूर्वी अभिषेक शर्माने मोठं ध्येय स्पष्ट केलं. वैयक्तिक विक्रमांपेक्षा टीमसाठी योगदान आणि ट्रॉफी जिंकण्याला प्राधान्य असल्याचं त्याने सांगितलं. तसंच युवा खेळाडूंना मिळणारा पाठिंबा आणि गोलंदाजांचा विचार समजून घेण्याबाबतही त्याने भाष्य केलं.
Abhishek Sharma
Abhishek Sharmasaam tv
Published On: 

भारताने नुकत्याच जिंकलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकपमधील विजयामुळे टीममधील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलाय. आजपासून भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 सिरीजला सुरुवात होणार आहे. या सिरीजपूर्वी भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने त्याचं ध्येय स्पष्ट केलंय. "मला फक्त सामने किंवा वैयक्तिक विक्रम करायचे नाहीत, तर ट्रॉफी जिंकायच्या आहेत," असं अभिषेकने म्हटलं आहे.

जिओस्टारच्या 'फॉलो द ब्लूज: जेन-नेक्स्ट अभिषेक' या शोमध्ये अभिषेक शर्माने त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. एका स्पर्धेत मिळालेला विजय पुन्हा पुन्हा मिळवणं सोपं नसतं. मात्र टीममधील प्रत्येक खेळाडूला भारतासाठी जिंकायचं असेल तर विजयाची सवय लागते, असं अभिषेकने सांगितलं.

Abhishek Sharma
Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

एकदा जिंकणं सोपं, पण सातत्य ठेवणं कठीण

अभिषेक म्हणाला, "मी जेव्हा टीम इंडियामध्ये आलो तेव्हा माझं वय २४ वर्ष होतं. आता मी २६ वर्षांचा आहे. युवा खेळाडू म्हणून अजून खूप काही मिळवायचं आहे, असं तुम्ही स्वतःला सांगत असता. एखादी गोष्ट एकदा करणं तुलनेने सोपं असतं. पण तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं आणि त्यासाठीची मेहनत कायम ठेवणं सोपं नसतं."

"संघातील प्रत्येकाला एकमेकांसाठी खेळायचं असेल, भारताला जिंकवायचं असेल आणि मैदानावर वर्चस्व गाजवायचं असेल, तर हीच गोष्ट हळूहळू सवय बनते. त्याचा खेळाडूंना नक्कीच फायदा होतो," असंही त्याने सांगितलं.

वैयक्तिक विक्रमांपेक्षा टीमसाठी योगदान महत्त्वाचं

अभिषेकने सांगितलं की, सुरुवातीपासूनच त्याचा प्रयत्न टीमसाठी मोठी खेळी करण्याचा राहिलाय. तो म्हणाला, "ज्यावेळी मी सुरुवात केली तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता की, टीमसाठी चांगली खेळी करायची. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघाकडून खेळताना हा विचार आणखी मजबूत झाला. २०२४ मध्ये आम्ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा जिंकली. त्यानंतर माझ्या मनात ही गोष्ट पक्की झाली की, मला वैयक्तिक विक्रमांच्या मागे धावायचं नाही."

Abhishek Sharma
Vaibhav Suryavanshi: इंग्लंडविरूद्ध वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का? अखेर कर्णधार श्रेयस अय्यरने दिलं उत्तर

"किती रन्स करायचे किंवा कोणता टप्पा गाठायचा हे नेहमी आपल्या हातात नसतं. पण टीमसाठी किती प्रभाव पाडायचा, हे आपल्या हातात असतं. त्यामुळे समोर कोणतीही टीम असो, मला याच पद्धतीने खेळायचं आहे," असं अभिषेकने स्पष्ट केलं.

'माझं एकच ध्येय होतं, ट्रॉफी जिंकायच्या'

अभिषेकने पुढे सांगितलं, "एक खेळाडू म्हणून मला कधीही असं वाटलं नाही की, मला हे मिळवायचं आहे किंवा तो विक्रम करायचा आहे. माझं एकच ध्येय होतं, ते म्हणजे ट्रॉफी जिंकायच्या."

आपल्या खेळासाठी टीमकडून मिळणाऱ्या पाठिंब्याचं महत्त्वंही त्याने सांगितलं. तो म्हणाला "यासाठी टीमचा, मॅनेजमेंटचा, प्रशिक्षकांचा आणि कर्णधाराचा खूप पाठिंबा लागतो. कारण तुम्ही कशा पद्धतीने खेळता, हे त्यांना माहीत असतं. त्यांनी मला खूप मदत केली आहे. फक्त प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफनेच नाही, तर टीममधील खेळाडूंनी आणि वरिष्ठ खेळाडूंनीही मला साथ दिली," असं अभिषेक म्हणाला.

"मी जेव्हा नवीन होतो तेव्हा मला जशी मोकळीक मिळाली, तशीच मोकळीक नव्या खेळाडूंनाही मिळायला हवी. त्यांना आपण या टीमचा भाग आहोत, असं वाटायला हवं. त्यामुळे वैभव किंवा इतर युवा खेळाडूंशी बोलताना मला खूप आनंद होतो," असंही त्याने सांगितलं.

Abhishek Sharma
Vaibhav Sooryavanshi: जिंकली आरसीबी, हवा मात्र वैभवची; मिळाले 5 अवॉर्ड्स, लाखो रूपये आणि नवी कोरी कार

गोलंदाजाच्या विचारांचा आधीच अंदाज घेण्याचा प्रयत्न

जागतिक दर्जाचे गोलंदाज आणि टीम समोर असताना सहज धावा मिळणार नाहीत, याची अभिषेकला जाणीव आहे. त्यामुळे तो सामन्यापूर्वी वेगळ्या पद्धतीने तयारी करतो. "मी मैदानात जातो आणि फक्त फटके मारतो, असं नाही. माझ्यासमोर जगातील सर्वोत्तम गोलंदाज आणि टीम असतात. ते मला हव्या त्या ठिकाणी चेंडू टाकणार नाहीत आणि सहज धावा देणार नाहीत. एक खेळाडू म्हणून समोरचा गोलंदाज काय विचार करत असेल, याचा अंदाज घेणं ही माझी जबाबदारी आहे." असं त्याने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com