

भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या वनडे सिरीजमधील पहिला सामना दिल्लीऐवजी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार असल्याची चर्चा रंगलीये. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या वृत्तांचं खंडन केलंय. पहिल्या वनडे सामन्याच्या ठिकाणात बदल करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सामना होणार की नाही, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता उत्तर मिळालं आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सिरीजला १३ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. सिरीजमधील पहिला सामना दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलाय. मात्र दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे हा सामना अहमदाबादमध्ये हलवण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना देवजीत सैकिया यांनी सामना हलवण्याचा निर्णय घेतल्याची बातमी चुकीची असल्याचं सांगितलं. BCCI ने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सामन्याच्या शेड्यूलबाबत कोणतीही नवीन माहिती मिळवण्यासाठी अधिकृत घोषणांकडे लक्ष द्यावं, असं आवाहनही त्यांनी माध्यमांना केलं.
सैकिया यांनी पुढे सांगितलं की, द्विपक्षीय क्रिकेट सामन्यांचं आयोजन ठराविक धोरणानुसार केलं जातं. त्यामुळे सामन्यांच्या ठिकाणाबाबत निर्णय घेताना या धोरणाचं पालन केलं जातं.
BCCI च्या वेळापत्रकानुसार, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामने पुढीलप्रमाणे होणार आहेत.
१३ डिसेंबर- पहिला वनडे सामना, दिल्ली
१६ डिसेंबर- दुसरा वनडे सामना, बंगळुरू
१९ डिसेंबर- तिसरा वनडे सामना, अहमदाबाद
या सिरीजमधील शेवटचा वनडे सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. त्यामुळे पहिला सामना देखील अहमदाबादमध्ये हलवण्यात आल्याच्या चर्चेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, BCCI ने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या सामन्याच्या ठिकाणात बदल झालेला नाही.
वनडे मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय सिरीजही खेळवली जाणार आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या भारत दौऱ्यात वनडे आणि टी-२० अशा दोन्ही प्रकारच्या क्रिकेटचा समावेश असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.