Rohit Sharma: मुंबईचा राजा एकटा भिडला! शतक झळकावल्यानंतर भावुक करणारी Reaction व्हायरल

Rohit Sharma Century News: चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली. मात्र शतक झळकावल्यानंतर त्याने कुठलंही सेलिब्रेशन केलेलं नाही.
मुंबईचा राजा एकटा भिडला! शतक झळकावल्यानंतर भावुक करणारी Reaction व्हायरल
rohit sharma no celebration after scoring century against chennai super kings video viral amd2000twitter

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संगारा १८६ धावा करता आल्या. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्माने शतकी खेळी केली. दरम्यान शतक झळकावल्यानंतर त्याने कुठलंही सेलिब्रेशन केलं नाही.

या सामन्यात रोहित शर्माने एकाकी झुंज दिली. त्याने शेवटच्या षटकात मथिशा पाथिरानाच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कव्हर्सच्या दिशेने चौकार मारत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याचे टी-२० क्रिकेटमधील ८ वे शतक ठरले आहे. मात्र हे शतक झळकावल्यानंतर त्याने कुठलीही रिअॅक्शन दिली नाही. रोहितचं शतक पूर्ण होताच हेड कोच मार्क बाऊचर, फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्डसह स्टेडियममध्ये उपस्थित सर्व फॅन्स त्याचं कौतुक करताना दिसून आले.

मुंबईचा राजा एकटा भिडला! शतक झळकावल्यानंतर भावुक करणारी Reaction व्हायरल
MI vs CSK, IPL 2024: लाईव्ह सामन्यात पोलार्ड, टिम डेव्हिड अंपायरसोबत भिडले! नेमकं काय घडलं? -Video

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल..

रोहित शर्माच्या शतकी खेळीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शतक पूर्ण केल्यानंतर फलंदाज जोरदार जल्लोष करत असतात. मात्र यावेळी रोहितने शतक पूर्ण केल्यानंतर बॅट हवेत उंचावलीच नाही. नॉन स्ट्राईकवर असलेल्या मोहम्मद नबीने त्याचं कौतुक केलं. रोहितने या डावात धावांचा पाठलाग करताना ६३ चेंडूंत नाबाद १०५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि ५ षटकार मारले.

मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माला वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रोहितनंतर तिलक वर्माने ३१ आणि इशान किशनने सर्वाधिक २३ धावांची खेळी केली.

मुंबईचा राजा एकटा भिडला! शतक झळकावल्यानंतर भावुक करणारी Reaction व्हायरल
RCB vs SRH, IPL 2024: फलंदाजांची चांदी की गोलंदाजांचा कहर? बंगळुरुची खेळपट्टी कोणाला साथ देणार? वाचा पिच रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com