Rohit Sharma Record: सिक्स हिटिंग मशिन हिटमॅन! टी-२० क्रिकेटमध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरलाय आशियातील पहिलाच फलंदाज

Rohit Sharma Record In T20 Cricket: या सामन्यात फलंदाजी करत असताना रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधील एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. काय आहे तो रेकॉर्ड? जाणून घ्या.
mi vs csk ipl 2024 rohit sharma becomes the only batsman in asia to hit 500 sixes in t20 cricket
mi vs csk ipl 2024 rohit sharma becomes the only batsman in asia to hit 500 sixes in t20 cricket twitter

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारत २० धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला २०७ धावांची गरज होती. मात्र मुंबईला केवळ १८६ धावां पर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून रोहित शर्माने एकाकी झुंज देत शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Most Sixes By Asian Batsman In T20 Cricket)

रोहित शर्माने या डावातील तिसरा षटकार मारताच टी -२० क्रिकेटमध्ये ५०० षटकार पूर्ण केले आहे. तो टी -२० क्रिकेटमध्ये ५०० षटकार मारणारा आशिया खंडातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने २००६ मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता तो आशिया खंडातील सिक्सर किंग ठरला आहे.

mi vs csk ipl 2024 rohit sharma becomes the only batsman in asia to hit 500 sixes in t20 cricket
MI vs CSK, IPL 2024: लाईव्ह सामन्यात पोलार्ड, टिम डेव्हिड अंपायरसोबत भिडले! नेमकं काय घडलं? -Video

रोहित शर्माबद्दल बोलायचं झालं तर त्याने आपल्या टी -२० कारकिर्दीतील पहिला षटकार २००६ मध्ये झालेल्या इंटर स्टेट टी -२० ट्रॉफीमध्ये मारला होता. आता आयपीएल २०२४ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना त्याने आपल्या टी -२० कारकिर्दीतील ५०० वा षटकार मारला आहे. मुख्य बाब म्हणजे जेव्हा रोहितने पहिला षटकार मारला आणि ५०० षटकार मारला, या दोन्हीवेळी अजिंक्य रहाणे उपस्थित होता.

mi vs csk ipl 2024 rohit sharma becomes the only batsman in asia to hit 500 sixes in t20 cricket
MI vs CSK, IPL 2024: मुंबई- चेन्नई लढतीत रोहितच किंग! मोडून काढला सर्वात मोठा रेकॉर्ड

रोहितने रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर हा ऐतिहासिक षटकार मारला. रोहित शर्मा हा भारतीय संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटने आतापर्यंत ३८३ षटकार मारले आहेत. तर आशिया खंडात रोहित शर्मानंतर सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हा पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिकच्या नावावर आहे. त्याने ४२० षटकार मारले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com