आयपीएल स्पर्धेत जेव्हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येत असतात. तेव्हा क्रिकेट चाहत्यांना अॅक्शनपॅक सामना पाहायला मिळत असतो. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असते. या सामन्यात रेकॉर्ड्सचा पाऊसही पाडला जातो. दरम्यान या सामन्यात रोहित शर्माने हार्दिक पंड्याचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
रोहितने मोडला मोठा रेकॉर्ड..
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहितला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी केवळ ५ धावांची गरज होती. चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने चौकार मारत आपलं खातं उघडलं. त्यानंतर १ धाव पूर्ण करताच त्याने रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी त्याने ७३२ धावा केल्या होत्या. तर सुरेश रैनाच्या नावे ७३६ धावा करण्याची नोंद आहे. रोहितने हा रेकॉर्ड रैनासमोरच मोडून काढला आहे. मात्र रैना सध्या समालोचकाच्या भूमिकेत आहे.
रोहित तुफान फॉर्ममध्ये ...
मुंबई इंडियन्सने आपला शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात रोहित शर्माने संघाला शानदार सुरुवात करुन दिली होती. त्याने २४ चेंडूंचा सामना करत ३८ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ १९७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला होता. हे आव्हान मुंबईने १५.३ षटकात पूर्ण केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.