MI vs CSK, IPL 2024: लाईव्ह सामन्यात पोलार्ड, टिम डेव्हिड अंपायरसोबत भिडले! नेमकं काय घडलं? -Video

Kieron Pollard Tim David Argument With Umpire: मैदानाबाहेर कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड चौथ्या अंपायरसोबत भिडताना दिसून आले. दरम्यान नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
kieron pollard mark boucher and tim david argument with fourth umpire during mi vs csk match amd2000
kieron pollard mark boucher and tim david argument with fourth umpire during mi vs csk match amd2000twitter

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला २० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा मुंबईचा या हंगामातील चौथा पराभव ठरला आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत.

लाईव्ह सामन्यात राडा..

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येत असतात त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. मैदानात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. तर मैदानाबाहेर कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड चौथ्या अंपायरसोबत भिडताना दिसून आले. दरम्यान नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी सुरु असताना १५ वे षटक झाल्यानंतर हेड कोच मार्क बाऊचर, फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड आणि टिम डेव्हिड मैदानात जात होते. मात्र चौथ्या अंपायरने त्यांना मागे जाण्यास सांगितलं. टिम डेव्हिडने टाईमआऊट घेण्याचा इशारा केला होता. मात्र अंपायरचं लक्ष गेलं नाही. मार्क बाऊचर, पोलार्ड आणि टिम डेव्हिड मैदानात जाताच अंपायरने त्यांना मैदानाच्या बाहेर जाण्यास सांगितलं. त्यामुळे पोलार्ड, बाऊचर आणि टिम डेव्हिड अंपायरसोबत बाचाबाची करताना दिसून आले. शेवटी अंपायरने त्यांचं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे या तिघांनाही मैदानाच्या बाहेर जावं लागलं.

kieron pollard mark boucher and tim david argument with fourth umpire during mi vs csk match amd2000
MI vs CSK, IPL 2024: मुंबई- चेन्नई लढतीत रोहितच किंग! मोडून काढला सर्वात मोठा रेकॉर्ड

मुंबईचा पराभव..

या सामन्यात मुंबई इंडियन्सन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर २०६ धावा केल्या. चेन्नईकडून फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडने ६९ आणि शिवम दुबेने ६६ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करत असताना मुंबई इंडियन्स संघाला २० षटकअखेर १८६ धावा करता आल्या. रोहितने शतकी खेळी करुनही मुंबई इंडियन्स संघाला हा सामना २० धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com