आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानाव धावांचा पाऊस पाडला जातो. त्यामुळे या सामन्यातही मोठी धावसंख्या उभारली जाण्याची चिन्ह आहेत. दरम्यान खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या.
अशी असेल खेळपट्टी...
या मैदानावर आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३ सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडला गेला आहे. मात्र घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या संघाने घरच्या मैदानावर खेळताना २ सामने गमावले आहेत. या तिन्ही सामन्यांमधील पहिल्या डावात १७५ धावा केल्या गेल्या आहेत. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना हा आकडा आणखी वाढला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही संघाची धावसंख्या १७० च्या पुढे जाऊ शकते.
तसेच या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. कारण आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर या मैदानावर ७० टक्के विकेट्स या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. तर फिरकी गोलंदाजांना केवळ ३० टक्के विकेट्स घेता आल्या आहेत. है मैदान छोटं असल्याने या मैदानावर चौकार- षटकारांचा पाऊस पडतो. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने या मैदानावर सर्वाधिक सामने जिंकले आहे.
असा राहिलाय दोन्ही संघाचां हेड टू हेड रेकॉर्ड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांचा हेड टू हेट रेकॉर्ड पाहिला तर हे दोन्ही संघ २३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाने १२ वेळेस बाजी मारली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला १० सामने जिंकता आले आहेत. यादरम्यान १ सामना हा पावसामुळे रद्द केला गेला होता. या दोन्ही संघांमध्ये झालेल्या लढतीत हैदराबादचं पारडं जड राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र गेल्या ५ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला तर सनरायझर्स हैदराबाद संघाने ३ सामने जिंकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.