आयपीएल २०२४ स्पर्धेत रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळाले आहे. या हंगामातील ५ सामन्यांमध्ये त्याने १६७.७४ च्या स्ट्राइक रेटने १५६ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना सोडला तर उर्वरित सर्वच सामन्यांमध्ये त्याने संघाला शानदार सुरुवात करून दिली आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही रोहित शर्माकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान या सामन्यात त्याला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएल स्पर्धेतील एल क्लासिको म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लढतीत रोहितने ७३२ धावा केल्या आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना या यादीत अव्वल स्थानी आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये सुरेश रैनाने ७३६ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात जर रोहितने ५ धावा केल्या. तर रोहित सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सुरेश रैनाला मागे सोडणार आहे.
रोहित तुफान फॉर्ममध्ये...
मुंबई इंडियन्स संघाचा शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. त्याने अवघ्या २४ चेंडूंचा सामना करत ३८ धावांनी तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले. त्याने इशान किशनसोबत मिळून संघाला चांगली सुरुवात करून दिली. मुंबईला १९७ धावांनी गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबईने १५.३ षटकात धावांचा यशस्वी पाठलाग केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.