MI vs CSK, Head To Head Record: आयपीएल स्पर्धेतील El Clasico! मुंबई- चेन्नई आज भिडणार; कोणाचं पारडं राहिलय जड?

Mumbai Indians vs Chennai Super Kings Head To Head Record: आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.
MI vs CSK, Head To Head Record: आयपीएल स्पर्धेतील El Clasico! मुंबई- चेन्नई आज भिडणार; कोणाचं पारडं राहिलय जड?
MI vs CSK IPL 2023 El classico mumbai indians vs chennai super kings match details head to head record amd2000twitter

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दोन यशस्वी संघ आज आमने सामने येणार आहेत. मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. गुणतालिकेत चेन्नईचा तिसऱ्या स्थानी आहे. तर मुंबईने गेल्या २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यात खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या.

कशी असेल खेळपट्टी?

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी पर्वणी ठरते. लाल मातीच्या या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगला येतो. तसेच या स्टेडियमची बाउंड्री देखील छोटी आहे. त्यामुळे फलंदाजांना षटकार मारणं सोपं जातं. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यानंतर ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल होऊन जाते. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असली तरीदेखील बाऊंड्रीलाईन छोटी असल्याने फलंदाज मोठे फटके खेळतात. त्यामुळे या मैदानावर धावांचा पाऊस पाडला जाऊ शकतो.

MI vs CSK, Head To Head Record: आयपीएल स्पर्धेतील El Clasico! मुंबई- चेन्नई आज भिडणार; कोणाचं पारडं राहिलय जड?
LSG vs DC, IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सने लखनौचा 6 गडी राखून केला पराभव; ऋषभ पंतच्या संघाचा दुसरा विजय

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

हे दोन्ही संघ स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघाच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर हे दोन्ही संघ ३६ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाला २० सामने जिंकता आले आहेत. तर चेन्नईला १६ सामने जिंकता आले आहेत.

MI vs CSK, Head To Head Record: आयपीएल स्पर्धेतील El Clasico! मुंबई- चेन्नई आज भिडणार; कोणाचं पारडं राहिलय जड?
LSG vs DC, IPL 2024: 'मी तर DRS घेतलाच नव्हता..' लाईव्ह सामन्यात रिषभ अन् अंपायरमध्ये वाद! नेमकं काय घडलं?

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

मुंबई इंडियन्स संघाची संभावित प्लेइंग ११: रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जी, आकाश मधवाल.

अशी असू शकते चेन्नई सुपर किंग्ज संघाची संभावित प्लेइंग ११: ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार ), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, समीर रिजवी, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), दीपक चाहर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com