इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने शतक ठोकले. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शतक ठोकणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज ठरला. इंग्लंडने दिलेल्या ३८८ धावांच्या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने अवघ्या ८५ चेंडूंत शानदार शतक (१०२ धावा) झळकावून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
सामन्यात 'ड्रिंक्स ब्रेक' (Drinks) झाला तेव्हा भारताने ३१ षटकांत १ बाद २०६ धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा ८५ चेंडूंत १०२ धावांवर, तर विराट कोहली १७ चेंडूंत २३ धावांवर खेळत आहे.
मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र घेतला आणि इंग्लिश गोलंदाजांवर दबाव आणला. त्याने मैदानाभोवती चौफेर फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या शतकी खेळीत 4 षटकार आणि 9 चौकार ठोकले. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. इंग्लंडने ५० षटकांत अवघे ३ गडी गमावून ३८७ धावांचा डोंगर उभा केला आणि भारतासमोर विजयासाठी ३८८ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले.
लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडच्या ३८८ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली आहे. डोंगरासारख्या लक्षाचा पाठलाग करताना दडपणाखाली न येता कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने भारतीय डावाची सुरुवात अत्यंत आक्रमक पद्धतीने केली. दोघांनीही मैदानावर स्थिरावल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. गिल आणि रोहित शर्माने १४७ धावांची भागिदारी करत भारताला अश्वासक सुरूवात करून दिली. गिलने ८४ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावला.
3८८ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मासोबत सलामीला आलेल्या शुभमन गिलने ८४ चेंडूंत ७७ धावांची महत्त्वपूर्ण आणि संयमी खेळी केली. रोहित शर्माच्या साथीने गिलने भारतीय डावाला अतिशय भक्कम सुरुवात करून दिली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने पहिल्या गड्यासाठी १४७ धावांची मजबूत शतकी भागीदारी रचली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.