IND vs AFG Test Match: टीम इंडियानं उभारला ५६४ धावांचा डोंगर, गिलचे वादळी शतक, पंतनेही झोडपले

IND vs AFG 1st Test Match Day 2 : भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान होत असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तुफान फलंदाजी केली. दुसऱ्या दिवसाच्या दुपारपर्यंत भारतीय संघाने ५६४ धावा केल्या होत्या.
IND vs AFG 1st Test Match Day 2
Shubman Gill and KL Rahul celebrate their centuries as India pile up 564 runs before declaring against Afghanistan in the first Test.saam tv
Published On

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एक कसोटी सामना खेळला जातोय. हा कसोटी सामना न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे खेळला जातोय. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने ८ गडी गमावून ५६४ धावांवर आपला डाव घोषित केला. कसोटी सामन्यात भारत खूप मजबूत स्थितीत आहे. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. डाव घोषित करेपर्यंत टीम इंडियानं ३ विकेट गमावत ३६८ धावा जोडल्या होत्या.

दरम्यान ऋषभ पंतचे शतक हुकले आणि तो पहिल्या डावात ८१ धावांवर बाद झाला. मानव सुतारने पहिल्या डावात २८ धावा केल्या. सिराजने ११ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने ६५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ५२ धावांवर नाबाद राहिला, तर कुलदीप यादव ९ धावांवर नाबाद राहिला.

भारताने पहिल्या डावात ८ विकेट गमावून ५६४ धावा केल्या. आपल्या डावात टीम इंडियाचं वर्चस्व पाहायाला मिळालं. भारताकडून शुबमन गिलने मोठी खेळी करत १२६ धावा केल्या. तर केएल राहुलनंही १०० धावा केल्या. दुसरीकडे अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सलीमने सर्वात जास्त ६ विकेट घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com