BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

shubman gill wins bcci cricketer of the year award : बीसीसीआयने २०२५ या वर्षासाठी पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. कर्णधार शुभमन गिल याला बीसीसीआयने सर्वात मोठा पुरस्कार जाहीर केला आहे.
शुभमन गिल बेस्ट! बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार घोषित
Shubman Gill, Rohit Sharma And Virat Kohlisocial media
Published On

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२५ या वर्षासाठीच्या पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याला मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. बीसीसीआयने शनिवारी BCCI Naman Awards 2026 ची यादी जाहीर केली असून, त्यात गिल याला क्रिकेटर ऑफ द इयर (पुरुष), तर स्मृती मंधाना हिला इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर (महिला) म्हणजेच पॉली उमरीगर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, १५ मार्चला होणार आहे.

बीसीसीआयने नमन अॅवॉर्ड्सची सुरुवात २००६-०७ मध्ये केली होती. त्यात आदल्या वर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यात येतं. पुरुष गटात बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर अॅवॉर्डला पॉली उमरीगर अॅवॉर्डही म्हटलं जातं.

शुभमन गिल हा सध्या भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. गिलला दुसऱ्यांदा पॉली उमरीगर पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. २०२५ मध्ये ९ कसोटी सामन्यांत ९८३ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षी सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज ठरला होता. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्यानं ७५४ धावा केल्या होत्या. याशिवाय ११ वनडे सामन्यांत ४९० धावा केल्या होत्या.

स्मृती मंधाना हिलाही सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट महिला इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयरच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण पाचव्यांदा ती या पुरस्काराची मानकरी ठरणार आहे.

गिलची टी २० वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी हुकली

कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार असलेल्या शुभमन गिल याला टी २० वर्ल्डकपच्या आधी भारताच्या टी २० संघातून वगळण्यात आले होते. खराब फॉर्ममुळे त्याला संघातून डच्चू देण्यात आला होता. २०२५ च्या सुरुवातीपासूनच टी २० मध्ये तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला टी २० संघातून वगळले होते.

रॉजर बिन्नी, राहुल द्रविड, मिताली राज यांचाही सन्मान

बीसीसीआयकडून रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि मिताली राज यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. या तिन्ही दिग्गज खेळाडूंना लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड जाहीर झाला असून, उद्या रविवारी नवी दिल्लीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

शुभमन गिल बेस्ट! बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार घोषित
Pak vs Ban : रन आऊटवरून 'रणकंदन'! पाकिस्तान-बांगलादेशी खेळाडूंमध्ये मैदानातच राडा, सलमान आगा भडकला, ग्लोव्ह्ज आपटले, हेल्मेट फेकला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com