कोलकात्यात रिंकू सिंहचं वादळ, KKRने मिळवला पहिला विजय; अतितटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पराभूत

kkr vs rr : कोलकात्यात रिंकू सिंहने वादळी फलंदाजी केली. या स्पर्धेत KKRने पहिला विजय मिळवला आहे. अतितटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पराभूत झाला आहे.
IPL News
kkr vs rrSaam tv
Published On
Summary

केकेआरने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मिळवला पहिला विजय

केकेआरने राजस्थान रॉयल्सविरोधात ४ गडी राखून मिळवला विजय

रिंकू सिंहची वादळी खेळी ठरतेय चर्चेचा विषय

कोलकाता नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएस स्पर्धेत पहिला विजय मिळवला आहे. केकेआरने रविवारी राजस्थान रॉयल्सच्या विरोधात ४ विकेटने सामना जिंकला आहे. राजस्थान रॉयल्सने केकेआरला ईडन गार्डन्समध्ये १५६ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आरआरने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या केकेआरने ६ गडी गमावून सामना जिंकला. अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वातील केकेआरने यंदाच्या स्पर्धेत पहिला सामना जिंकला आहे. आरआरने सहा सामन्यापैकी केवळ २ सामने जिंकले आहेत.

IPL News
RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या केकेआरची सुरुवात खराब झाली. टिम सीफर्ट आणि कर्णधार अंजिक्य रहाणे शून्य धावावर बाद झाले. जोफ्रा आर्चरने सीफर्टला पहिल्याच षटकात बाद केलं. तर राहणेला नांद्रे बगर्रने दुसऱ्या षटकात बाद केले. त्यानंतर कॅमरून ग्रीनने १३ चेंडूत २७ धावा कुटल्या.

ग्रीनला रवि बिश्नोईला पाचव्या षटकात बाद केले. अंगकृष रघुवंशीने १९ चेंडूत १० धावा केल्या. त्यानंतर जडेडाने रघुवंशीला बाद केलं. रोवमॅन पॉवेल देखील फार मोठी खेळी खेळू शकला नाही. जडेजानेही त्याला ११ व्या षटकात बाद केलं. रमनदीप सिंह देखील १४ व्या षटकात बाद झाला.

८५ धावांवर सहा गडी बाद झाल्यानंतर रिंकू सिंह आणि अनुकूल रायने संघाचा डाव सांभाळला. दोघांनी सातव्या विकेटसाठी ७६ धावांची भागादारी रचली. केकेआरला शेवटच्या दोन षटकात २१ धावा हव्या होत्या. १९ व्या षटकात केकेआरने १२ धावा काढल्या. यात एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर शेवटच्या षटकात ९ धावा पाहिजे होत्या. रिंकू सिंहने बृजेश शर्माच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार लगावले. त्यानंतर तिसरा बॉल डॉट गेला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार लगावून विजय मिळवला. अनुकूलने १६ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या.

IPL News
राजस्थान रॉयल्सच्या विजयाने पॉइंट्स टेबलमध्ये उलटफेर; कोणत्या संघाला झाला फायदा?

केकेआरने फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने आरआरला १५५ धावांवर रोखलं. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने २८ चेंडूत २८ धावा कुटल्या. यशस्वी जयस्वालने २९ चेंडूत ३९ धावा कुटल्या. पहिल्या विकेटसाठी ८.४ षटकात दोघांनी ८१ धावा कुटल्या. दोघांची भागीदारी तुटल्यानंतर राजस्थान रॉयल्सवर दबाव वाढला. चक्रवर्ती आणि नरेनने राजस्थान रॉयल्स संघावर दबाव निर्माण केला. त्याचा फायदा केकेआरला झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com