Rahul Dravid: RCB किंव्हा DC नव्हे तर राहुल द्रविड या संघाला देणार प्रशिक्षण? IPL 2025 स्पर्धेसाठी मिळाली मोठी ऑफर

Rahul Dravid Head Coach: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे.
Rahul Dravid: RCB किंव्हा DC नव्हे तर राहुल द्रविड या संघाला देणार प्रशिक्षण? IPL 2025 स्पर्धेसाठी मिळाली मोठी ऑफर
rahul dravidsaam tv
Published On

राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांच्यासाठी शेवटची स्पर्धा होती. हा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड आगामी आयपीएल २०२५ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्रशिक्षण देताना दिसून येऊ शकतात. न्यूज १८ बांगलाने दिलेल्या वृत्तामध्ये असा दावा केला जात आहे की, कोलकाता नाईट रायडर्सने राहुल द्रविड यांना मार्गदर्शकपदाची ऑफर दिली आहे.

Rahul Dravid: RCB किंव्हा DC नव्हे तर राहुल द्रविड या संघाला देणार प्रशिक्षण? IPL 2025 स्पर्धेसाठी मिळाली मोठी ऑफर
IND vs ZIM: दुसरा सामना जिंकूनही शुभमन गिलची डोकेदुखी वाढली! समोर आलं मोठं कारण

राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. जर तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला, तर त्याला हे पद सोडावं लागेल. गौतम गंभीरने हे पद सोडल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अनुभवी खेळाडूच्या शोधात असेल. अशावेळी राहुल द्रविड हा सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो.

Rahul Dravid: RCB किंव्हा DC नव्हे तर राहुल द्रविड या संघाला देणार प्रशिक्षण? IPL 2025 स्पर्धेसाठी मिळाली मोठी ऑफर
IND vs ZIM: 6,6,6,6,6..झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू सिंगचा कहर! मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीला सोडू शकतो मागे

राहुल द्रविड हे फलंदाज म्हणून हिट होते. तर प्रशिक्षक म्हणून सुपरहीट आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने फायनलमध्ये धडक दिली होती. मात्र फानयलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यापूर्वी त्यांनी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाच्या कोचिंग स्टाफमध्येही काम केलं आहे. याचा कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा फायदा होऊ शकतो.

गौतम गंभीरबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २०२२ आणि २०२३ मध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. त्यावेळी या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. तर २०२४ मध्ये गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघात कमबॅक केलं. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदाला गवसणी घातली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com