ICC Rankings: IPL मध्ये ट्रोल ते वर्ल्डकपचा हिरो! टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिकला ICC कडून मोठं गिफ्ट

ICC T20I All Rounders Rankings: वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीनंतर हार्दिक पंड्याला आयसीसीकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे.
ICC Rankings: IPL मध्ये ट्रोल ते वर्ल्डकपचा हिरो! टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिकला ICC कडून मोठं गिफ्ट
Hardik pandyatwitter

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. या संपूर्ण स्पर्धेत हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीची आणि फलंदाजीची जादू पाहायला मिळाली. आयपीएल स्पर्धेतील फ्लॉप शोनंतर त्याला भारतीय संघातून बाहेर करण्याची मागणी केली जात होती. मात्र मोक्याच्या क्षणी त्याने शेवटचं षटक टाकलं आणि पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद करत सामना भारतीय संघाच्या बाजूने फिरवला. या विजयानंतर त्याला आयसीसीकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे.

बनला नंबर १ अष्टपैलू खेळाडू

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील शानदार कामगिरीनंतर हार्दिक पंड्या आयसीसीच्या टी-२० अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत वनिंदू हसरंगासह अव्वल स्थानी पोहोचला आहे. हार्दिक पंड्या आणि वनिंदू हसरंगा या दोघांचेही रेटिंग पॉईंट्स २२२ आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिस या यादीत २११ रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार २१० रेटिंग पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे.

ICC Rankings: IPL मध्ये ट्रोल ते वर्ल्डकपचा हिरो! टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिकला ICC कडून मोठं गिफ्ट
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

तर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन २०६ रेटिंग पॉईंट्ससह सहाव्या स्थानी पोहोचला आहे. हार्दिक पंड्याला आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आपली छाप सोडण्यात यश आलं. त्याने गोलंदाजीत आणि फलंदाजीत शानदार कामगिरी केली. त्याने फलंदाजी करताना १४४ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना ११ गडी बाद केले.

ICC Rankings: IPL मध्ये ट्रोल ते वर्ल्डकपचा हिरो! टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिकला ICC कडून मोठं गिफ्ट
IND-W vs SA-W: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! दक्षिण आफ्रिकेला 10 विकेट्सने लोळवलं

आयसीसीने शेअर केलेल्या टी-२० अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. ज्यात शाकिब अल हसन, सिकंदर रजा, लियाम लिविंगस्टन हे १-१ पाऊल पुढे सरकले आहेत. तर मोहम्मद नबी टॉप ५ मधून बाहेर पडला आहे. तर फायनलमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारा अक्षर पटेल या यादीत १२ व्या स्थानी पोहोचला आहे. या पूर्वी १९ व्या स्थानी होता.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारतीय संघाच्या विजयानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांना टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत केलेल्या कामिगिरीचं फळ मिळालं आहे. टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये विराट कोहली ४० व्या स्थानी पोहोचला आहे. तर रोहित शर्माने ३६ व्या स्थानी उडी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com