IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

Hardik Pandya, T20 World Cup 2024: भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली.
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो
hardik pandyatwitter

मयुर सावंत>>

तो झुंझार खेळला,हार्ड हिट्स मारले.टीम इंडियाच्या बॉलर्सला अक्षरश: गुंडाळलं होतं. भारतीयांचा श्वास या क्लासेननं रोखून ठेवला. एका क्षणासाठी भारतानं सामना गमावला होता.. पण हिटमॅनच्या एका निर्णयानं हा सामना, साऊथ आफ्रिकेच्या हातातून खेचून आणला आणि झुंझार खेळी करणाऱ्या क्लासेनची बॅट रोहितनं थांबवली.

क्लासेन हा साऊथ आफ्रिकेचा दमदार खेळाडू म्हणून ओळखला जातो. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला होता. या स्पर्धेत त्याने अविस्मरणीय खेळ्या केल्या. तिच स्ट्रॅटेजी त्यानं इथं वापरली आणि झुंझार खेळीनं टीम इंडियावर अटॅक करण्यास सुरूवात केली. अगदी बॅटिंगमध्ये भरभरून कौतुक करणाऱ्या अक्षर पटेललाही त्यानं गार केलं.

IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो
Rohit Sharma, IND vs SA: हाच फरक आहे.. मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला, रोहितने खेळपट्टीची पवित्र माती चाखली - VIDEO

अक्षर हा फिटकीपटू असला तरी,क्लासेनने करारा जवाब देत टीमला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. अक्षर पटेलच्या १५ व्या ओव्हरमध्ये त्यानं सिक्स आणि चौके मारत एकूण २४ धावा केल्या. आता भारताला सगळं अवघड होऊन बसलं होतं. पण क्लासेनच्या या खेळीला रोहित शर्मानं चांगलंच पारखलं आणि जसप्रीत बुमराहकडे पुढची जबाबदारी दिली.

IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो
IND vs SA, Final: कर्णधार असावा तर असा! रोहितने घेतलेल्या या 3 मोठ्या निर्णयांनी टीम इंडियाला बनवलं चॅम्पियन

जसप्रीतनं वेगवान बॉलिंग करत त्याला हादरवून सोडलं. पण त्याला विकेट घेता आला नाही. अखेर रोहितने त्याचा अत्यंत जवळचा आणि ऑलराऊंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुकमी एक्क्याला बाहेर काढलं. हार्दिकला १७ वी ओव्हर दिली. यावेळी हार्दिकनं आपली स्ट्रॅटेजी वापरली.

पहिल्याच बॉलमध्ये क्लासेनची विकेट काढली आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. क्लासेनने २७ बॉलमध्ये ५२ धावा काढल्या आणि हार्ड हिटच्या नादात तो विकेट पाडून बसला. त्यामुळे रोहित शर्माला त्याला थांबवण्यात यश मिळालं आणि तो क्लासेनपेक्षा वरचढ ठरला..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com