भारताचा स्टार फलंदाज रिंकू सिंग भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडतोय. आयपीएल स्पर्धेत लागोपाठ ५ षटकार मारल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे. तेव्हा तेव्हा त्याने संधीचं सोनं केलं आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याच्या आक्रमक फलंदाजीचा कहर पाहायला मिळाला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यात त्याने षटकारांचा पाऊस पडत दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
रिंकू सिंगने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी करत ५ षटकार खेचले. दरम्यान त्याने भारतीय संघासाठी टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटच्या २ षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. रिंकू सिंगने आतापर्यंत १७ षटकार मारले आहेत. तर एमएस धोनीने १९ षटकार मारले होते. मुख्य बाब म्हणजे एमएस धोनीने हा रेकॉर्ड २५८ चेंडूत केला. तर रिंकूने आतापर्यंत अवघे ४८ चेंडू खेळले आहेत. त्यामुळे लवकरच रिंकू सिंग या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीला मागे सोडू शकतो.
भारतीय संघासाठी शेवटच्या २ षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हार्दिक पंड्या अव्वल स्थानी आहे. त्याने ३२ षटकार खेचले आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीने २४ षटकार खेचले आहेत. नुकतेच विराट कोहलीने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.
हार्दिक पंड्या - ३२ षटकार ( १९३ चेंडू)
विराट कोहली -२४ षटकार (१५८ चेंडू)
एमएस धोनीने - १९ षटकार (२५८ चेंडू)
रिंकू सिंग - १७ षटकार (४८ चेंडू)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.