IND Vs ZIM: रिंकू सिंहचा षटकार पाहून डोक्याला लावाल हात; मुझारबानीच्या चेंडूला पाठवलं थेट मैदानाबाहेर, Video

Rinku Singh: भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात आज दुसऱ्या T20 सामन्यात रिंकू सिंहने आपल्या पॉवर हिटिंगने सर्वांना प्रभावित केलं. पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर आज रिंकू सिंहने 218.18 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
IND Vs ZIM: रिंकू सिंहचा षटकार पाहून डोक्याला लावाल हात; मुझारबानीच्या चेंडूला पाठवलं थेट मैदानाबाहेर, Video
Rinku SinghIndian Express
Published On

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने 100 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 234 धावा केल्या. अभिषेक शर्माने तडाखेबाज फलंदाजी करत 46 चेंडूत शतक झळकावलं. मात्र या सामन्याच्या अखेरीस रिंकू सिंहचे धमाल पाहायला मिळाली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने एक षटकार मारला जो पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला.

रिंकूने इतक लंबा फटका मारला की, चेंडू थेट मैदानाबाहेरच गेला. आजच्या सामन्यात रिंकू सिंहने आपल्या पॉवर हिटिंगचे उदाहरण सादर केले. भारताच्या डावातील 19व्या डावात मुझारबानी गोलंदाजीसाठी आला होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिंकू सिंगने एक पाय जमिनीवर ठेवला आणि लाँग ऑफच्या दिशेने हवेत शॉट खेळला आणि चेंडू स्टेडियमबाहेरील झाडावर पडला. त्याने 104 मीटर लांब षटकार मारला.

रिंकू सिंहने दुसऱ्या टी-20 सामन्यात केवळ 22 चेंडूत 48 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 2 चौकार लगावले. या डावात त्याचा स्ट्राइक रेट 218.18 होता. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाने शेवटच्या षटकांमध्ये धावा झटपट वाढल्या. भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 234 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 134 धावांवरच गारद झाला.

IND Vs ZIM: रिंकू सिंहचा षटकार पाहून डोक्याला लावाल हात; मुझारबानीच्या चेंडूला पाठवलं थेट मैदानाबाहेर, Video
IND vs ZIM: पदार्पणाच्या दुसऱ्याच सामन्यात अभिषेक शर्माचा पराक्रम; ठोकलं टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं वहिलं शतक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com