IND vs ZIM: पदार्पणाच्या दुसऱ्याच सामन्यात अभिषेक शर्माचा पराक्रम; ठोकलं टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं वहिलं शतक

IND vs ZIM Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माने टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार शतक झळकावले. या सामन्यात त्याने 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या.
IND vs ZIM: पदार्पणाच्या दुसऱ्याच सामन्यात 
अभिषेक शर्माचा पराक्रम; ठोकलं टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं वहिलं शतक
IND vs ZIM Abhishek Sharma Centuryx
Published On

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी केली.

पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माने दुसऱ्या सामन्यात हिरो ठरलाय. त्याने अवघ्या ४६ चेंडूत आपलं पहिलं वहिलं आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील शतक ठोकलं. या सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी करत एक खास विक्रमही आपल्या नावावर केलाय. त्याने असा पराक्रम केला जो याआधी कोणताही भारतीय खेळाडू करू शकला नाहीये.

IND vs ZIM: पदार्पणाच्या दुसऱ्याच सामन्यात 
अभिषेक शर्माचा पराक्रम; ठोकलं टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं वहिलं शतक
IND vs ZIM Abhishek Sharma Century:

झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने शानदार शतक झळकावले. या सामन्यात त्याने 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील पदार्पणाच्या दुसऱ्याच सामन्यात शतक झळकावलं, असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय.

आयपीएलच्या सामन्यात अभिषेक शर्माने आपल्या फलंदाजीने अनेकांना आश्चर्यचकित केलं होतं. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात अभिषेकने आक्रमक फलंदाजी केली होती. आज झिम्बाब्वेविरुद्धच्या समान्यातही त्याने आक्रमक सुरुवात केली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याला दोनदा जीवनदान मिळालं होतं. याचा फायदा घेत अभिषेकने शानदार शतक ठोकलं.

या सामन्यात अभिषेक शर्माने 46 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले. पण शतक झळकावल्यानंतर तो जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. शतक केल्यानंतर तो पुढच्याच चेंडूवर त्याची विकेट गमवावी लागली. या डावात त्याने 212.77 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. हे भारताचे संयुक्त तिसरे सर्वात वेगवान टी-20 मधील शतक आहे.

अभिषेक शर्मासाठी हे शतक अनेक अर्थांनी खास आहे. त्याने हे शतक केवळ दुसऱ्या T20 सामन्यात झळकावले आहे. सर्वात कमी डावात T20I शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनलाय. यापूर्वी हा विक्रम दीपक हुडाच्या नावावर होता. त्याने तिसऱ्या T20I डावातच शतक झळकावले होते. याशिवाय दुसऱ्या T20I डावात शतक झळकावणारा अभिषेक शर्मा जगातील तिसरा फलंदाज आहे.

दरम्यान मालिकेतील पहिल्या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वातील संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. त्याच दृष्टीने दुसऱ्या सामन्यात खेळाताना भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची जबर धुलाई केली. भारतीय संघाने २३४ धावा करत २३५ धावांचे आव्हान समोरील संघाला दिलंय

IND vs ZIM: पदार्पणाच्या दुसऱ्याच सामन्यात 
अभिषेक शर्माचा पराक्रम; ठोकलं टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं वहिलं शतक
IND vs ZIM 2nd T20 : भारताने काढला पराभवाचा वचपा; झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांची तुफान धुलाई, २३४ धावा चोपल्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com