Abhishek Sharma Record: विराटवर अभिषेक शर्मा पडला भारी! मोडून काढला किंग कोहलीचा मोठा रेकॉर्ड
abhishek sharma breaks record of virat kohli of hitting most sixes in single ipl season amd2000saam tv news

Abhishek Sharma Record: विराटवर अभिषेक शर्मा पडला भारी! मोडून काढला किंग कोहलीचा मोठा रेकॉर्ड

Abhishek Sharma Breaks Virat Kohli Record: सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक हंगामात रेकॉर्ड बनवले जातात आणि मोडलेही जातात. या हंगामातही रेकॉर्डचा पाऊस पाडला गेला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्माने देखील शानदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने सुरुवातीला फलंदाजीला येत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. यासह हेडसोबत मिळून संघाला मोठी धावसंख्या देखील उभारून दिली आहे. (Most Sixes In IPL Season)

डावाची सुरुवात करताना त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने गोलंदाजांवर हल्लाबोल केला आहे. पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने रेकॉर्डचा पाऊस पाडला आहे. त्याने विराट कोहलीचा सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या हंगामात तो आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. (Virat Kohli)

Abhishek Sharma Record: विराटवर अभिषेक शर्मा पडला भारी! मोडून काढला किंग कोहलीचा मोठा रेकॉर्ड
IPL 2024 Playoffs: RCB चा संघ प्लेऑफमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? समजून घ्या समीकरण

पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. त्याने १८ चेंडूंचा सामना करत ६६ धावा चोपल्या. ज्यात ६ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. या सामन्यात त्याने अवघ्या २१ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह तो आयपीएलच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत त्याने या हंगामात ४१ षटकार मारले आहेत. हा आकडा ५० च्या पार जाऊ शकतो. कारण हैदराबादचा संघ प्लेऑफचे सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. (Abhishek Sharma Record)

Abhishek Sharma Record: विराटवर अभिषेक शर्मा पडला भारी! मोडून काढला किंग कोहलीचा मोठा रेकॉर्ड
RR vs KKR, IPL 2024: शेवटच्या सामन्यात कोण उधळणार विजयाचा गुलाल? असा राहिलाय राजस्थान - केकेआरचा रेकॉर्ड

आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज

अभिषेक शर्मा -४१* षटकार(२०२४)

विराट कोहली - ३८ षटकार (२०१६)

रिषभ पंत - ३७ षटकार (२०१८)

विराट कोहली - ३७ (२०२४)

शिवम दुबे -३५ (२०२३)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com